अ.भा.ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना खानदेश-जामनेर तालुका स्तरीय बैठक
पूर्व खानदेश जामनेर, तालुका प्रतिनिधी :- अखिल भारतीय ध्रुवदरा पंगत क्रांतिकारी सामाजिक संघटना पूर्व खानदेश जामनेर तालुका च्या वतीने संघटनेचे संस्थापक समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार व राष्ट्रीय अध्यक्ष/ज्येष्ठ पत्रकार संजीव भांबोरे यांच्या मार्गदर्शनात जामनेर तालुका आढावा बैठक मा.संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष सुधाकर कडू शिंगारे यांच्या अध्यक्षतेखालील व संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष गणपत भाऊ सोनार यांच्या प्रमुख उपस्थित साईराज कंप्यूटर रेडियम सेंटर,जामनेर येथे कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमांमध्ये संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणपत भाऊ सोनार यांनी जामनेर तालुकास्तरीय कार्यकर्त्यांना अपंगाच्या योजना विषयी तर नामदेव चौधरी (पाटील) यांनी दिव्यांगाची दशा व दिशा कशी असायला पाहिजे याविषयी समजावून सांगितले. कार्यक्रमांमध्ये एकनाथ कोळी, सरलाबाई कोळी, कैलास जाधव, राजू नाईक, पवार साहेब, सरलाबाई कोळी, ममताबाई राजपूत, जामनेर तालुका अध्यक्ष (महिला आघाडी) ज्योतिबाई राजपूत, सरिताबाई सोनार, कल्पना मिस्त्री, एकनाथ इंगळे, उत्तम इंगळे, रेखाबाई परदेसी, नम्रताबाई सोनार, राजेश नाईक,जामनेर तालुका उपाध्यक्ष (महिला आघाडी) मंगला रमेश पोहरे व जामनेर तालुका स्तरीय कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे मंच संचालक जामनेर तालुका अध्यक्ष उत्तम इंगळे तर मार्गदर्शन जामनेर तालुका उपाध्यक्ष यांनी केले.
0 Response to "अ.भा.ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना खानदेश-जामनेर तालुका स्तरीय बैठक "
एक टिप्पणी भेजें