अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेची गोंदिया येथे बैठक
गोंदिया (संजीव भांबोरे) :- येथील शासकीय विश्रामगृहात अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेची बैठक अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या मार्गदर्शनात अखिल भारतीय धृततारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष भार्गव वाघमारे यांच्या उपस्थितीत 21 जानेवारी 2024 ला दुपारी 12 वाजता शासकिय विश्राम ग्रुह गोंदिया घेण्यात आली .या सभेत गोंदिया जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश राऊलकर, गोंदिया जिल्हा कोषाध्यक्षपदी किशोर वलगाये, गोंदिया जिल्हा सहसचिव पदी देविदास बलबुद्धे ,सडक अर्जुनी तालुका उपाध्यक्ष पदी रामकृष्ण कुरसुंगे यांची नियुक्ती करण्यात आली .या सभेत मार्गदर्शन करताना जिल्हा अध्यक्ष भार्गव वाघमारे यांनी सांगितले की निराधार योजनेचे मानधन ,युडीआय डी बरेच दिव्यांगांना मिळाले नाहीत त्यामुळे आपल्याला एकत्रित येऊन न्याय देण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश राहुल कर यांनी केले. यावेळी प्रदीप सरोदे ,नरेश कुंभरे, नरेश भालाधरे, बबलू घरडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Response to " अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेची गोंदिया येथे बैठक"
एक टिप्पणी भेजें