अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटने तर्फे राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी
जळगाव :- अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना जिल्हा जळगावच्या वतीने संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या मार्गदर्शनात जळगाव जिल्हा जामनेर तालुक्यातील ज्ञान सरिता महिला बहुउद्देशीय संस्था वाकडी येथे अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुधाकर कडू सिंगारे व कार्यक्रमाच्या अध्यक्ष शारदा गणेश सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजमाता जिजाऊ यांच्या 426 व्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे जयंतीचे औचित्य साधून अपंगाच्या हक्काचे स्वतंत्र व्यासपीठ असावे व त्यांचे प्रश्न शासनापर्यंत एकजुटीच्या माध्यमातून मांडता यावे याकरिता जिल्हाध्यक्ष सुधाकर कडू सिंगारे यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने नियुक्तीपत्र देण्यात आले. यात जामनेर तालुका अध्यक्षपदी ज्योती वामन राजपूत ,जामनेर महिला तालुका उपाध्यक्षपदी मंगला रमेश पोहरे ,भुसावळ तालुकाध्यक्षपदी सुनीताबाई मामराज पवार ,जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी मदनसिंह राजपूत ,जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी सरला शिवराम भोई ,जामनेर तालुका सहसचिव सदानंद दामोदर मोहिते ,जामनेर तालुका उपाध्यक्ष उत्तम विठ्ठल इंगळे ,जामनेर तालुका अध्यक्ष जितेंद्र देवराव आगळे ,जळगाव जिल्हा संघटक मुकेश सुरेश गुजर, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय गणपत सोनार ,शिलाबाई महेंद्र सोनवणे ,राजू नाईक खडकी ,रमेश सोनी फत्तेपूर ,दिगंबर सोनी फत्तेपूर नेहा भगवान राजपूत, ज्ञान महिला बौद्ध संस्था चे सदस्य ,महिला व पुरुष यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Response to " अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटने तर्फे राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी"
एक टिप्पणी भेजें