अंभोरा येथे वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाचे लोकार्पण सोहळा व पहेला ते अंभोरा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम संपन्न
• केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस कार्यक्रमाचे विशेष आकर्षण
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) :- भंडारा ते नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या अंभोरा येथे वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाचे लोकार्पण सोहळा प्रकल्पाची एकूण किंमत 176 कोटी ,पुलाची लांबी 705.20 मीटर त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील पहेला ते अंभोरा सिमेंट क्रॉटिक रस्त्याचे भूमिपूजनाच्या कार्यक्रम प्रकल्पाची एकूण किंमत 24.90 कोटी, रस्त्याची लांबी 7.60 किलोमीटर 13 जानेवारी 2024 ला दुपारी दोन वाजता अंभोरा देवस्थान येथे संपन्न झाला .वरील कार्यक्रमाचे उद्घाटन नितीनजी गडकरी केंद्रीय परिवहन मंत्री महामार्ग विभाग भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा हे उपस्थित होते .प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार कृपाल तुमाने रामटेक लोकसभा क्षेत्र ,खासदार सुनील मेंढे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र , , गंगाधर जीभकाटे अध्यक्ष भंडारा जिल्हा परिषद ,भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर ,नागपूर येथील जिल्हाधिकारी विपिन , माजी आमदार राजू पारवे, माजी खासदार डॉ .विकास महात्मे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश नंदनवार मुख्य कार्यकारी अभियंता नागपूर यांनी केले .विशेष पाहुण्यांचे स्वागत दिनेश नंदनवार मुख्य कार्यकारी अभियंता नागपूर ,अधीक्षक जनार्दन भानुसे ,दिलीप देवळे कार्यकारी अभियंता, अंभोरा येथील सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागपूर व भंडारा जिल्ह्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
0 Response to "अंभोरा येथे वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाचे लोकार्पण सोहळा व पहेला ते अंभोरा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम संपन्न"
एक टिप्पणी भेजें