-->

फ़ॉलोअर

अस्पृश्य मुठभर महार बटालियनच्या पराक्रमामुळेच आज आपल्याला चांगले दिवस -राज्य सरचिटणीस संजीव (बौद्ध) भांबोरे

अस्पृश्य मुठभर महार बटालियनच्या पराक्रमामुळेच आज आपल्याला चांगले दिवस -राज्य सरचिटणीस संजीव (बौद्ध) भांबोरे



* शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे भीमा कोरेगाव शौर्य वर्धापन दिन उत्साह साजरा 

संजीव भांबोरे

भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :- पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे 1 जानेवारीला 206 वा  भीमा कोरेगाव शौर्य वर्धापन दिवस उत्साह कार्यक्रम  साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध( मेश्राम) होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव बौद्ध( भांबोरे) हे उपस्थित होते .प्रमुख अतिथी म्हणून सुरेंद्र बुंदले ,प्रशांतकुमार बोदेले, सहादेव शेंडे, प्रणय रामटेके, उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भीमा कोरेगाव येथे शहीद झालेल्या सर्व शूर वीरांना आदरांजली वाहिण्यात आली .त्याचप्रमाणे मानवंदना देण्यात आली  .यावेळी मार्गदर्शन करताना संजीव बौद्ध (भांबोरे )म्हणाले की. १ जानेवारी 1818 मध्ये पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे अस्पृश्य महार बटालियन व पेशव्यामध्ये युद्ध झाले .संख्येने कमी असलेल्या महार बटालियन सैन्याने  पेशवाई सैनिकांचा पराभव केला .त्याठिकाणी इंग्रजांनी विजयस्तंभ उभारला. त्या विजय स्तंभाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १ जानेवारी 1927 ला आपल्या असंख्य सहकाऱ्यांसोबत  मानवंदना देऊन आपल्या संघर्षाची सुरुवात केली. तेव्हापासून या विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी हजारो बौद्ध बांधव ,१ जानेवारीला हजारो बांधव तेथे मानवंदना देण्यासाठी जात असतात. कारण त्यांच्या या शूरपणामुळे आम्हाला चांगले दिवस मिळाले आहेत. आणि त्यांच्या लढा हा कोणी विसरू शकत नाही .नाहीतर आज आपल्या तोंडाला गाडगा आणि कमरेला झाडू यापुरतेच आपण मर्यादित राहिलो असतो. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता नलू गोंडाणे ,बबन गोंडाने ,गोपाल रोडगे ,कुणाल चव्हाण, अमित लोणारे ,शांता शेंडे ,प्रदीप मानवटकर सहकार्य केले. 

0 Response to "अस्पृश्य मुठभर महार बटालियनच्या पराक्रमामुळेच आज आपल्याला चांगले दिवस -राज्य सरचिटणीस संजीव (बौद्ध) भांबोरे"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article