बुद्धिस्त समाज संघर्ष समिती तालुका लाखांदूर च्या वतीने 22 प्रतिज्ञा चे वाचन.
लाखांदूर :- आज दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती तालुका लाखांदूर च्या वतीने लाखांदूर येथे बुद्ध विहाराच्या जागेवर 22 प्रतिज्ञाचे वाचन करण्यात आले. 22 जानेवारी 1947 रोजी भारताच्या संविधानाची प्रस्तावना संविधान सभेत मंजूर करण्यात आली होती. त्या दिनाचे औचित्य साधून व अयोध्येत राम लल्लाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली त्यात भगवान बुद्धाला विष्णूचा ९ वा अवतार दाखविण्यात आले. त्याचा निषेध म्हणून बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती तालुका लाखांदूर च्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या त्या प्रतिज्ञाचे सार्वजनिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमास बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीचे मुख्य संयोजक चंद्रशेखर टेंभुरणे, संयोजक उद्धव रंगारी, तालुकाध्यक्ष प्राध्यापक संदीप मोटघरे, सचिव बबन गजभिये, प्रकाश बारसागडे, गोपाल मेंढे, ज्योती रामटेके, निरू मेश्राम, बिंदू रामटेके, अर्पणा जांगडे, वनिता गायकवाड, मोदक राज रामटेके, , प्रकाश रंगारी, जगदीश रंगारी, शांताराम खोब्रागडे, सुनील शेंडे, आणि बहुसंख्य बौद्ध अनुयायी कार्यक्रमाला उपस्थित होते. 22 प्रतिज्ञा चे वाचन प्राध्यापक उद्धव रंगारी व प्रकाश बारसागडे यांनी वाचून दाखविले. आभार संदीप मोटघरे यांनी मानले.
0 Response to " बुद्धिस्त समाज संघर्ष समिती तालुका लाखांदूर च्या वतीने 22 प्रतिज्ञा चे वाचन."
एक टिप्पणी भेजें