सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती ! मग सुशिक्षित बेरोजगारांनी पकोडे विकायचे काय?- संजीव भांबोरे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना
भंडारा :- येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये जे सेवानिवृत्त शिक्षक झाले आहेत त्यांचीच नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर तात्पुरता स्वरूपात करण्याचा आदेश उपसचिव शासन शालेय निर्णय व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्रमांक संकीर्ण 2023/ प्र क्र /362/ टीएएनटी-१, ७ जुलै 2023 ला काढला असून जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत जिल्हा परिषद या व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यासंदर्भात पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात आले आहेत व त्या संबंधाची जाहिरात 18 डिसेंबर 2023 ला प्रकाशित झालेली आहे व ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची तारीख 29 डिसेंबर 2023 ला पर्यंत आहे .सरकार जर अशा जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांना ज्यांची काम करण्याची कुवत नाही अशा शिक्षकांना सेवानिवृत्तीनंतर कंत्राटी तत्त्वावर जिल्हा परिषद शाळेत नेमणूक करत असेल तर जिल्ह्यातील डीएड, बीएड ,एम एड, सुशिक्षित बेरोजगारांनी काय करायचं? त्यांनी पकोडे विकायचे काय ?असा सवाल अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी उपस्थित केलेला आहे. शासनाने सेवानिवृत्ती शिक्षकांना जिल्हा परिषद शाळेत सामावून घेण्याचा जो जीआर काढला आहे तो तात्काळ त्यांनी मागे घ्यावा अन्यथा जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कोणताही अनुचित प्रकार घडला तर याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल ?शासनाजवळ पैसे नसतील तर त्यांनी सुशिक्षित बेरोजगारांची १० हजार रुपये मानधनावर नियुक्ती करावी . असे कित्येक बेरोजगार बेरोजगार आहेत की ते १० हजार रुपये मानधनावर नोकरी करण्यास तयार आहेत. एका बाजूला जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांना पेन्शन मिळत आहे ! व त्याच पेन्शनधारी शिक्षकांना सेवानिवृत्तीनंतर मानधनावर नियुक्ती करणे हे कितपत योग्य आहे?
0 Response to " सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती ! मग सुशिक्षित बेरोजगारांनी पकोडे विकायचे काय?- संजीव भांबोरे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना"
एक टिप्पणी भेजें