राज्यस्तरीय नागभूषण आदर्श समाजरत्न पुरस्काराने" सतीश सोमकुवर सन्मानित
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :- सामाजिक कार्यात अग्रेसर व फुले शाहू आंबेडकर चळवळीत योगदान असणारे व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत प्रबोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून थोर संत महापुरुषयांचे समतावादी विचार, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती, बेटी बचाव - बेटी पढाव, ग्रामस्वच्छता, भारतीय संविधान आदी विषयावर आपल्या ओजस्वी वाणीतून व प्रबोधन शैलीद्वारे प्रबोधन करून समाजागामध्ये जन जागृतीचे कार्य करणारे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, हिंगणा तालुका समतादूत, प्रबोधनकार श्री.सतीश राजकुमार सोमकुवर यांना सत्य शोधक समाज, रिसर्च ग्रुप नागपूर यांच्या वतीने दिनांक १७ डिसेंबर २०२३ नागलोक इसासनी येथे राज्यस्तरीय "नागभूषण आदर्श समाजरत्न पुरस्कार" सत्य शोधक समाज, रिसर्च ग्रुप नागपूर ,चे मुख्य संयोजक नागमित्र धर्मेश पाटील, सुषमाताई कळमकर सामाजिक कार्यकर्त्या नागपूर, व गोविंदराव सोमकुवर यांच्या हस्ते व बहुजन मुक्ती मोर्चा संयोजक सुनीलजी डोंगरे,ओबीची मोर्चा नागपूर चे श्री चौधरीजी सत्यशोधक समाज राष्ट्रीय संयोजिका राणी मोहोड, आदी मान्यवसरांच्या उपस्थिती प्रदान करण्यात आला. त्याबद्दल सतीश सोमकुवर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून नरेंद्र बनसोड, श्रावण गोसावी, पंकज भगत, महेंद्र सुखदेवे, मंगेश गुजर, मोहन पुडके, अमर पानतावणे, अमित मेश्राम, राहुल सोनडवले, उद्धव बडगे,यांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली करीता शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.
0 Response to "राज्यस्तरीय नागभूषण आदर्श समाजरत्न पुरस्काराने" सतीश सोमकुवर सन्मानित"
एक टिप्पणी भेजें