अखिल भारतीय धुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना (संपूर्ण भारत) ग्राम वडाळा येथे जागतिक अपंग दिन साजरा.
---------------------------------------------
जळगाव( संजीव भांबोरे ): - अखिल भारतीय धुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना (संपूर्ण भारत) जिल्हा जळगाव च्या वतीने ग्रामपंचायत वडाळा (बिगर) तालुका जामनेर येथे जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुधाकर कडू शिंगारे होते तर प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सरपंच संजय अर्जुन बनसोडे, उपसरपंच राजू भाऊराव पाटील ,ग्रामपंचायत सदस्य त्रिंबक आकरे ,नामदेव खंडू पाटील, रामकृष्ण वाघ इतर ग्रामस्थ, क्षेत्रातील दिव्यांग बांधव, उपस्थित होते. कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना मिठाई ,बिस्किट व इतर साहित्य वाटून त्यांचे मनोबल वाढविणेयाविषयी मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
0 Response to " अखिल भारतीय धुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना (संपूर्ण भारत) ग्राम वडाळा येथे जागतिक अपंग दिन साजरा."
एक टिप्पणी भेजें