अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या जामनेर तालुका उपाध्यक्षपदी उत्तम इंगळे यांचे नियुक्ती
जळगाव :- जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मालखेडा येथील प्रवासी उत्तम विठ्ठल इंगळे यांचे अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे .ही नियुक्ती अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी एका लेखी पत्रकाद्वारे केलेली आहे. उत्तम इंगळे मागील पंधरा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यरत असून आता त्यांनी अंध ,अपंग कर्णबधिर ,मूकबधिर च्या सेवेसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले .त्यांच्या या नियुक्ती बद्दल त्यांच्या अनेक चाहत्यांनी अभिनंदन केलेले असून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आलेले आहेत.
0 Response to "अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या जामनेर तालुका उपाध्यक्षपदी उत्तम इंगळे यांचे नियुक्ती"
एक टिप्पणी भेजें