भारतीय पार्लमेंट फुले ,शाहू ,आंबेडकर विचार विचारधारेवर चालली पाहिजे- वंचितचे नेते एडवोकेट प्रकाश आंबेडकर
* कस्तुरचंद पार्क नागपूर येथे मनुस्मृति दहन दिनानिमित्त स्त्रि मुक्ती महिला परिषदेला मार्गदर्शन
नागपूर (संजीव भांबोरे) :- आपल्याला भारतीय संविधानाने दिलेले हक्क ,अधिकार मिळवून घ्यायची असेल तर येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये शाहू फुले ,आंबेडकर विचारधाराचा माणूस संसदेत जायला हवा त्याकरिता सर्वांनी एकत्र येऊन पक्ष वाढीसाठी कार्य करावे असे आवाहन वंचितचे नेते एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथील कस्तुरचंद येथे मनुस्मृति दहन दिनानिमित्त स्त्रीमुक्ती महिला परिषदेला मार्गदर्शन करताना सांगितले .समजा 2024 च्या निवडणुकीपासून आपण दूर राहिलो तर भारतीय संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे असे सुद्धा त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले .त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी गाफील न राहता सावध राहिले पाहिजे व त्या दृष्टिकोनातून विदर्भातील सर्व लोकसभेकरिता आतापासूनच कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असे आवाहन सुद्धा यावेळी त्यांनी केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष अंजलीताई आंबेडकर ,महाराष्ट्र प्रदेश वंचितच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रेखाताई ठाकूर, निशाताई शेंडे महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या महासचिव अरुंधती ताई शिरसाट ,सुरेखाताई कातडे ,किरणताई गिरी महाराष्ट्र प्रदेश सदस्य , गजाला खान महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष , माधुरीताई शेलोकर यांची यावेळी प्रामुख्याने भाषणे झाली . लीलाताई चितळे या 94 वर्षाच्या आजीबाईंनी सुद्धा बाबा आणि बापू यांचे सुंदर उदाहरण सांगितले की ,बाबासाहेब तुमचे बाप असून तुम्ही त्यांचे लेकर आहात आणि आत्ता तुमची सर्वांची जबाबदारी बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पहायचे आहे त्याकरिता सर्वांनी त्यांना साथ द्यायची आहे असे आवाहन सुद्धा यावेळी त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तनुजा रायपूरकर यांनी केले .या मनुस्मृती महिला परिषदेत काही ठराव सुद्धा पास करण्यात आले 25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली हा दिवस भारतीय स्त्रीमुक्ती दिवस म्हणून जाहीर करण्यात यावा ,राजस्थानची राजधानी जयपूर येथे उच्च न्यायालयाच्या आवारामध्ये मनुचा पुतळा उभारला आहे तो तात्काळ हटविण्यात यावा ,महिला आरक्षण कायदा सुधारणा करून ओबीसी व अल्पसंख्यांक महिलांसाठी निश्चित तरतूद करण्यात यावी, मणिपूर मधील आदिवासी महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी केंद्राने घ्यावी व तेथील हिंसाचार बंद करण्यात यावेत आरोपीला फाशी देण्यात यावी, बिहार राज्य प्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुद्धा ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी असे अनेक ठराव महिला परिषदेत त्रिमूर्ती दिनानिमित्त संमत करण्यात आले .यावेळी सर्व महापुरुषांना अभिवादन सुद्धा करण्यात येऊन समता सैनिक दलातर्फे सलामी स्वीकारण्यात आली. यावेळी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील महिला भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "भारतीय पार्लमेंट फुले ,शाहू ,आंबेडकर विचार विचारधारेवर चालली पाहिजे- वंचितचे नेते एडवोकेट प्रकाश आंबेडकर"
एक टिप्पणी भेजें