मुंढरी बुज च्या पुनर्वसन बाबद आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांची मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याशी चर्चा केली
तुमसर :- मुंढरी बुज येथील पुनर्वसन या महत्वाच्या विषयावर मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना.श्री. अनिलजी पाटील आणि मंत्री महोदयांचे खासजी सचिव मा.श्री. महाजन साहेब यांच्याशी आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांनी चर्चा केली.या विषयाबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी, भंडारा यांच्याकडुन मागितला जाईल आणि लवकरच या विषयाबाबत मिटिंग लावली जाईल, मिटिंग मध्ये मार्ग काढत पीडितांना न्याय देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात येईल असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना.श्री. अनिलजी पाटील यांनी आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांना दिले.
0 Response to " मुंढरी बुज च्या पुनर्वसन बाबद आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांची मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याशी चर्चा केली"
एक टिप्पणी भेजें