पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय आंबा ,परतुर येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन.
जितेंद्र गाडेकर
जालना ब्युरो चिफ
जालना, आंबा - परतुर :- पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय आंबा - परतूर येथे दिनांक 24/ 12/23, वार - रविवार , वेळ - सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत विद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये माजी विद्यार्थी मेळाव्याचे(एलुमनी मीट)आयोजन केले आहे. विद्यालयातील माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत, या आयोजनाच्या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थी एकत्र यावेत.जुन्या आठवणी पुन्हा ताज्या व्हाव्यात तसेच आपले अनुभव विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरावेत हा कार्यक्रमाचा उद्देश आहे.या माजी विद्यार्थी
मेळाव्याला जवाहर नवोदय विद्यालयातील सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे आणि या सुवर्णक्षणांचे साक्षीदार व्हावे असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य श्री शैलेश नागदेवते सर यांनी केले आहे.
0 Response to "पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय आंबा ,परतुर येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन."
एक टिप्पणी भेजें