
लेफ्टनंट चषक पटले युवकांचा आदर्श: - आय.पी.एस.लोहित मतानी
* तुमसर - मिटेवाणीत लेफ्टनंट चषक चा जंगी सत्कार
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :- इच्छा तिथे मार्ग असते. जे स्वप्न बघतात त्याचे स्वप्न पूर्ण होतात.मिटेवाणी ग्रामीण भागात चषक सारखा हिरा जन्मास आला.त्यांनी वेळेचा सदुपयोग केला.मोठे स्वप्न बघितले,त्याला साकार करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली.भंडारा जिल्ह्यात यु. पी .एस.सी किंवा एम.पी. एस.सी.परीक्षेत ,स्पर्धा परीक्षेत युवकांनी यश संपादन करावे ,अशी माझी मनस्वी इच्छा होती.ती चषक पटले नी लेफ्टनंट बनून पूर्ण केली.याचा मला सार्थ अभिमान आहे.आई - बाबांच्या सोबत लेफ्टनंट चषकचा नागरी सत्कार होणे ही गौरवास्पद बाब आहे.खऱ्या अर्थाने लेफ्टनंट चषक अक्करसिंग पटले हा जिल्ह्यातील युवकांचा आदर्श ठरला आहे.असे प्रशंसनीय उदगार आय.पी.एस.लोहित मतानी पोलीस अधिक्षक भंडारा यांनी काढले.ते लेफ्टनंट चषक पटले यांच्या स्वागत समारोह नागरी सत्कार या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रश्मीता राव आय.पी.एस.उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणाल्या,लेफ्टनंट चषक अक्करसिंग पटले हा जिल्ह्यातील एकमेव व्यक्तिमत्व आहे.त्यामुळे युवकांसाठी प्रेरणास्रोत ठरेल.त्यांनी समाजसेवा,देशसेवा तर करावीच परंतु या जन्मभूमीतील युवकांना,जिल्ह्यातील युवकांना या संदर्भात मार्गदर्शन करावे.येणाऱ्या भावीपिढीने लेफ्टनंट चषक सारखी मेहनत करावी आणि अश्याच प्रकारची विविध क्षेत्रामध्ये युवकांनी गरुडझेप घ्यावी.असा आशावाद व्यक्त केला.
सत्कारमूर्ती लेफ्टनंट चषक अक्करसिंग पटले सत्काराला उत्तर देताना म्हणाला की,युवकांनी वेळेचे नियोजन करावे. मोबाईलचा सदुपयोग रचनात्मक कार्यासाठी करावा. व्हॉट्सअँप, फेसबुक,इंस्टाग्राम या पासून दूर रहावे.वाचनाचा छंद जोपासावा.कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही. नशीबावर विश्वास न ठेवता कर्मावर विश्वास ठेवून युवकांनी भविष्याचा वेध घ्यावा.मोठ्यांचा सन्मान करावा,लहानांना प्रेम द्यावे व राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी युवकांनी खारीचा वाटा उचलावा.असे प्रांजळ मत यावेळी व्यक्त केले.
पोलीस अधिक्षक लोहित मतानी भंडारा आणि पोलीस उपविभागीय अधिकारी रश्मीता राव यांनी लेफ्टनंट चषक पटले यांचा ग्रंथभेट, रोपटे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देवून अभिनंदन केले.पुढील वाटचालीसाठी मंगलमय सदिच्छा व्यक्त केल्यात. तुमसर नगरीत राजाराम लॉन समोर आतिषबाजीने लेफ्टनंट चषक चे जंगी स्वागत झाले.शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर मधील आर.एस.पी.पथकाने लेफ्टनंट चषक ला मानवंदना देण्यात आली.शारदा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फुलांचा वर्षाव करीत बँडपथकांने तुमसरकरांचे लक्ष वेधून लेफ्टनंट चषक पटलेचे जंगी स्वागत केले. हे दृश्य बघून विद्यार्थ्यांत नवचेतना निर्माण झाल्याचे दिसत होते. मिटेवाणी येथे आगमन होताच जि.प. विद्यालय मिटेवाणी मधिल विद्यार्थ्यांनी तिरंगे लहरवून लेफ्टनंट चषक चे स्वागत केले. मिटेवाणी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आंदांचा पुर वाहताना दिसला.एन. डी . ए.मध्ये यश संपादन करणारी कु.अक्षदा राजेश पडोळे हीचा सुद्धा आय.पी.एस. रश्मीता राव यांनी ग्रंथ भेट व रोपटं देवून सत्कार केला,ती सुद्धा अधिकारी होणार आणि तुमसर च्या सन्मानात मानाचा तुरा रोवणार. रमेश पारधी सभापती शिक्षण - आरोग्य जि.प.भंडारा,नंदुजी रहांगडाले सभापती पंचायत समिती तुमसर,बंदुभाऊ बनकर जि.प.सदस्य,वादुमल राणे सरपंच यांनी शुभेच्छा व्यक्त केल्यात.मराठा सेवा संघ,आलोक,ग्रामपंचायत मिटेवाणी,बचत गट,तंटामुक्ती,महिला मंडळ, राजमृदा ग्रूप, अखिल भारतीय अंधश्रद्धा समिती,जिजाऊ ब्रिगेड,संभाजी ब्रिगेड,रक्तवित संघटना,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम, वेल्फेअर पत्रकार असोसिएशन तुमसरच्या वतीने या नागरी सत्कार समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे विशेष!या प्रेरणादायी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल भुसारी यांनी केले.सूत्रसंचालन प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले.आभार प्रदर्शन बघेल यांनी केले.या कार्यक्रमाला राजकारणी,समाजकारणी, प्रतिष्ठीत मंडळी,संपूर्ण मिटेवानी ग्रामस्थ आणि जिल्ह्यातील मान्यवरांनी लेफ्टनंट चषक अक्करसिंग पटले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.हिरे भी निकलते है, मिटेवाणी की मिट्टीमे याची अनुभूती झाली. हे विशेष!
0 Response to "लेफ्टनंट चषक पटले युवकांचा आदर्श: - आय.पी.एस.लोहित मतानी "
एक टिप्पणी भेजें