विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक नावाचा बसस्थानक परिसरातील बोर्ड ग्रामपंचायत ने काढला
• नवरगाव येथील दोनशे कुटुंब बौद्ध बांधवांनी जातीवादी लोकांच्या जाचाला कंटाळून सोडले गाव
• गावगुंडांवर व ग्रामपंचायतवर केली कारवाईची मागणी
गडचिरोली( गौतम थोटे ):- चार्मोसी तालुक्यातील नवरगाव येथील गावात चौकात असलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे असलेले फलक येथील ग्रामपंचायत ने काढून टाकले. म्हणून 21 डिसेंबर 2023 ला येथील संपूर्ण 200 कुटुंबांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आला आहे .बोर्ड लावण्यापूर्वी येथील बौद्ध बांधवांनी ग्रामपंचायत ची रीतसर परवानगी घेण्यात आली होती. मात्र नवरगाव येथील गावगुंडांनी व ग्रामपंचायत ने चौकात असलेले बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक फलक असलेले बोर्ड काढून टाकल्याने त्यांचा विरोध म्हणून येथील दोनशे कुटुंब बांधवांनी या गावात आपल्याला राहण्याचा कोणताच अधिकार नाही म्हणून घर आणि जमीन सोडून आपल्या बैलबंडी, लहान मूलबाळ ,म्हातारे व आपल्या कुटुंबाच्या जीवनावश्यक साहित्य घेऊन पायवाट मार्गाने निघाले असून आम्ही बाबासाहेबांचा अपमान सहन करू शकत नाही म्हणून त्यांनी गाव सोडले असून ग्रामपंचायत सरपंच सहित संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत या गावात पुन्हा पाय न ठेवण्याचा निर्णय येथील बौद्ध कुटुंबाने घेतलेला आहे. या संपूर्ण कुटुंबाला न्याय देण्यात यावा याकरिता जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलावीत या घटनेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असून त्या पीडित कुटुंबांनी बोधिसत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कधी सहन करू शकणार नाही ही त्यांची मागणी रास्त असून ज्या गाव गुंडांनी व ग्रामपंचायत ने कृत्य केले त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी सुद्धा केलेली आहे.
0 Response to "विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक नावाचा बसस्थानक परिसरातील बोर्ड ग्रामपंचायत ने काढला "
एक टिप्पणी भेजें