-->

फ़ॉलोअर

 २ री खेलो राज्यस्तरीय मास्टर्स गेम्स चॅम्पियन अँथेलेटिक्स स्पर्धेत भंडारा जिल्ह्याचे  नावलौकिक

२ री खेलो राज्यस्तरीय मास्टर्स गेम्स चॅम्पियन अँथेलेटिक्स स्पर्धेत भंडारा जिल्ह्याचे नावलौकिक




* राजकुमार नंदेश्वर ,सुभाष चिमणकर ,पुरुषोत्तम चौधरी, विजय मदारकर,  गोल्ड मेडल व सिल्वर मेडल ने सन्मानित


* अमरावती येथे शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त केले होते कार्यक्रमाचे आयोजन


संजीव भांबोरे

भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :- शिवाजी एज्युकेशन सोसायटी येथे डॉ पंजाबराव उपाध्ये भाऊसाहेब देशमुख सतकोत्तर रोपे  महोत्सव 125 व्या जयंतीनिमित्ताने अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या ÷स्पर्धेत फायटर ग्रुप गुंथारा तालुका जिल्हा भंडारा चे सदस्य २ री खेलो राज्यस्तरीय मास्टर गेम्स  चॅम्पियनशिप अंथेलेटिक्स स्पर्धेत 25 नोव्हेंबर  ते 26 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या गुंथारा येथील राजकुमार तानबा नंदेश्वर यांनी रन  5000/मीटर्स वयोगट 55 ते 60 मध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले. त्याचप्रमाणे १५००/ मीटर मध्ये गोल्ड मेडल व ८००/मीटर मध्ये सिल्वर पदक प्राप्त केले. सुभाष राखडू चिमणकर सडक मुंडीपार वय 46 रन 5000 मीटर्स वय 45 ते 50 वयोगटात गोल्ड मेडल प्राप्त केले. त्याचप्रमाणे १५००/मीटर मध्ये गोल्ड मेडल व 800 मीटर मध्ये गोल्ड मेडल मध्ये प्राप्त केले.

पुरुषोत्तम धनराज चौधरी भंडारा वय ५२ ,  वयोगट 50 ते 55  , रन 5000/ मीटर मध्ये  सिल्वर मेडल व 800 मीटर मध्ये सिल्वर मेडल  प्राप्त केले.

विजय मोरेश्वर मदारकर वय 42 राहणार धारगाव वयोगट 40 ते 45 रन १०० मीटर सिल्वर मेडल, 200 मीटर सिल्वर मेडल व 800 मीटर गोल्ड मेडल प्राप्त केले. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे त्याचप्रमाणे भंडारा गोंदिया लोकसभेच्या बहुजन समाज पार्टीच्या प्रभारी निमाताई मोहरकर यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

0 Response to " २ री खेलो राज्यस्तरीय मास्टर्स गेम्स चॅम्पियन अँथेलेटिक्स स्पर्धेत भंडारा जिल्ह्याचे नावलौकिक "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article