विदर्भवादी शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशन येथे 8 डिसेंबर पासून धरणे आंदोलन
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी ) :- विदर्भवादी शेतकरी संघटनेच्या वतीने 8 डिसेंबर 2023 पासून हिवाळी अधिवेशन नागपूर येथे धरणे आंदोलनाचे आयोजन आरबीआय चौक नागपूर येथे विदर्भवादी शेतकरी संघर्ष संघटनेचे नेते सदानंद धारगावे व उपाध्यक्ष नम्रताताई बागडे यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेले आहे .यात प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देण्यात यावी ,धानाला 1000 रुपये बोनस देण्यात यावा ,सन 2006 ला पारित झालेला स्वामीनाथन आयोग तात्काळ लागू करावा ,धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे ,शेतकरी ,शेतमजूर ,श्रावण बाळ वृद्ध विधवा महिला, दिव्यांग व निराधार यांना सन 1994 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार किमान सन्मान पेन्शन योजनेअंतर्गत ६ हजार रुपये महिना देण्यात यावा ,शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण करता 25% आरक्षण देण्यात यावे ,शेतकऱ्यांचे विज बिल माफ करण्यात यावी,भूमीहीन
लोकांना घरांचे पट्टे देण्यात यावे व त्यांना जागा उपलब्ध करून घरकुल देण्यात यावा ,शेतकरी ,शेतमजूर, श्रावण बाळ व वृद्ध यांच्या वयाची अट ६५ ऐवजी 60 करण्यात यावी ,विधवा महिलांची चालु पेन्शन बंद करू नये ,गॅस सिलेंडर 300 रुपयांनी देण्यात यावे, पेट्रोल ,डिझेलचे भाव कमी करण्यात यावे ,शेतकऱ्यांना बी ,बियाणे औषधी 50 टक्के सबसिडी देण्यात यावी ,वरील मागण्यांकरिता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे .या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सीमा सरनागत ,पौर्णिमा खांडेकर ,स्वाती वासनिक ,विजया बागडे, सुनिता राऊत ,सुमित्रा देव्हारे ,चरणदास बर्वेकर, गुलाब रंधवे ,सुनील गजभिये, बाबूलाल मोहारे ,टीकाराम रहाटे, निलेश बारस्कर ,सत्यप्रकाश हटवार, टीकाराम कावळे ,रामभाऊ फुंडे ,ज्ञानेश्वर कावळे ,चंद्राहास येटरे विलास पांचलवार ,बालकदास मेश्राम ,मच्छिंद्र काटेखाये, रमेश रंगारी ,विनोद पारधी ,राजेश थेरे ,नरेंद्र गजभिये तु,ळशीराम बिलावणे ,पंढरी बडवे शालिक मेश्राम हिरादार घाटोळे ,मनोहर ढोमणे ,गोपाल घाटोळे नीलिमा घरजाडे ,राधिका चौधरी ,राजू कडबे ,उमासंकर यादव, नीताराम देवगडे ,विठ्ठल राऊत, यांनी केलेले आहे.
0 Response to " विदर्भवादी शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशन येथे 8 डिसेंबर पासून धरणे आंदोलन"
एक टिप्पणी भेजें