क्रिकेट खेळण्याच्या नादात आरोपी करण बिलवणे यांनी मृतक निवृत्तीनाथ कावळे यांचा घेतला बळी
• अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतील चिखली टोली गावातील घटना
• पोलिसांचे तपास चक्र सुरू
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :- अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिखली टोली येथील गावात आज दिनांक 5 नोव्हेंबर ला १.३० वाजेच्या सुमारास दोन खेळाडू मध्ये आपसात वाद होऊन तो वाद इतका विकोपाला गेला की ,आरोपी नामे करण रामकृष्ण बिलवणे वय 21 राहणार चिखली तालुका पवनी जिल्हा भंडारा व मृतक नामे निवृत्तीनाथ गोपीचंद कावळे वय 24 राहणार चिखली तालुका जिल्हा भंडारा दोघेही एकाच गावचे रहिवासी असून घटनेच्या दिवशी मौजा चिखली टोली येथील खुल्या ग्राउंड मध्ये क्रिकेट खेळत होते .क्रिकेट खेळत असताना मृतक व आरोपी हे इतर मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना मृतक व आरोपी यांचा पुन्हा एक मंच खेळू द्या या कारणावरून मृतक व आरोपी यांच्यात दोन दोन गोष्टी झाल्या. या कारणावरून आरोपीने मृतकाच्या हातातील क्रिकेट खेळण्याचे बॅटने मृतकाच्या पायावर मारले तेव्हा मृत खाली वाकला. त्याच वेळी आरोपीने पुन्हा बॅट मृतकाला मारण्यास उगारली असता मृतकाच्या मानेवर जाये बाजूला लागली. त्यामुळे मृतक जागेवर बेसुद्धा पडला .त्यास उपचाराकरिता ग्रामीण रुग्णाल अड्याळ येथे भरती केले असता उपचारादरम्यान मरण पावला. फिर्यादी प्रसाद रामकृष्ण धरमसहारे वय 23 राहणार चिखली यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्ट व ठाणेदार साहेब यांच्या आदेशाने सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे . कायमी अपराध क्रम 242 /२०२३ कलम 302 भादवी नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे .पोउपनी हेमराज सोरते/ बन 401 यांनी दाखल केला असून तपास सपोनी राऊत करीत आहेत .
0 Response to "क्रिकेट खेळण्याच्या नादात आरोपी करण बिलवणे यांनी मृतक निवृत्तीनाथ कावळे यांचा घेतला बळी"
एक टिप्पणी भेजें