67 वे संविधान दिन व राज्यस्तरीय संविधान सन्मान प्रतियोगिता गुण गौरव समारंभ
भंडारा :- भंडारा येथील जिल्हा परिषद सभागृहात भारतीय संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन दि.26नोव्हेंबर 2023 रोज रविवार ला दुपारी 11.00 वाजता संविधान दिन व संविधान सन्मान प्रतियोगिता यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा साजरा करण्यात येत आहे.
भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे आणि लिखित संविधान असुन भारताचा सर्वोच्च कायदा आहे. या संविधानामुळेच देशात अनेक जाती, धर्म, पंथ, भाषा असुनही अनेकतेत एकता निर्माण झालेली आहे. या संविधानाचा मुळ पाया हा समता, बंधुता व स्वातंत्र्य व न्याय या तत्वावर आधारलेला असल्यामुळेच देशाचा विकास झालेला आहे व देश विश्वगुरु होण्याच्या मार्गावर अग्रेसर झालेला आहे.
या 26 नोव्हेंबर संविधान दिनाचे औचित्य साधून 'भारतीय संविधान विषयी जनजागृती व महामानवांचे विचार शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवून भावी पिढीचा उत्कर्ष साधण्यासाठी आणि संविधान सभेतील सर्व मान्यवर सदस्य यांच्या योगदानाबद्दल त्या सर्वांना अभिवादन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शाळा व महाविद्यालयांमध्ये 'संविधान सन्मान प्रतियोगिता परिक्षा 2023 घेण्यात आली. या परीक्षेत गुणानुक्रमे येणाऱ्या विद्यार्थ्यांना 'संविधान दिन' कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, व न्यायाधीश यांच्या हस्ते रोख पारितोषिक, भारतीय संविधान व गुण गौरव प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर राहणार असून या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणुन बिजु गवारे, न्यायाधीश तथा जिल्हा सचिव, विधी सेवा प्राधिकरण भंडारा चे बिजु गवारे
जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी मुख्य
जिल्हा उपवनसंरक्षक राहुल गवई जिल्हा पुनर्वसन अधिकारी कु. लीना फलके, समाज कल्याण उपायुक्त बाबासाहेब देशमुख
केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली चे राष्ट्रीय चेअरमन तथा शांती समिती सदस्य दिल्ली अल्पसंख्यांक आयोग, भारत सरकार चे डॉ. मिलिंद दहिवले
तसेच पुर्व न्यायाधीश, सिव्हिल कोर्ट अडॉकेट भगवान रहाटे
पुर्व न्यायीक अधिकारी कैलास कानुगो आदी अतिथिंच्या हस्ते सन्मानीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन केंद्रीय मानवाधिकार संघटन राज्य प्रभारी डॉ. देवानंद नंदागवळी नाशिक चवरे, प्रा. शेखर बोरकर, जयेंद्र देशपांडे, मंगेश हुमने, महेन्द्र तिरपुडे, सोपान रंगारी, हेमा गजभिये, अश्विनी भिवगडे, प्रा. सुरज गोंडाने, प्रा. युवराज खोब्रागडे, पंकज वानखेडे, अंबादास नागदेवे, अनिल घुले, सरयु डहाट, सरीता नागपुरे व सहकारी यांनी केले आहे.
0 Response to " 67 वे संविधान दिन व राज्यस्तरीय संविधान सन्मान प्रतियोगिता गुण गौरव समारंभ"
एक टिप्पणी भेजें