अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षपदी प्राध्यापक छाया बोरकर यांची नियुक्ती
गोंदिया (संजीव भांबोरे ) :- अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षपदी प्राध्यापक छाया ताणबाजी बोरकर अर्जुनी मोरगाव यांची नियुक्ती अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांनी एका लेखी पत्रकाद्वारे केलेली आहे .प्राध्यापक छाया बोरकर एम ए बी एड असून त्यांची पळस फुले ,माणसाने खाल्ल्या मिठाला जगाव ,पुन्हा बुद्ध पाहिजे साहित्य प्रकाशित झालेले आहेत . त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रातील अनेक पदावर कार्यरत असून अखिल भारतीय परिषद मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष, आम्ही सिद्ध लेखिकाचे जिल्हा अध्यक्ष, मातोश्री जिजाऊ बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण प्रशिक्षण संस्था अर्जुनी मोरगाव या संस्थेचे संस्थापक सचिव व सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत. तसेच राष्ट्रीय पातळीवर १)इंडियन आयडल स्टार अवॉर्ड 2022 मध्ये मुंबई मध्ये सन्मानित२) ग्लोबल गोल्ड ऑफ रेकॉर्ड३) नारीशक्ती पुरस्कार ४)नारी रत्न पुरस्कार५) समाजभूषण पुरस्कार ६)काव्य लेखन पुरस्कार७) भारत गौरव पुरस्कार ८)काव्यरत्न पुरस्कार असे अनेक पुरस्काराने त्या सन्मानित करण्यात आलेले आहेत त्यांच्या नियुक्ती बद्दल अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख संजीव भांबोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिलेले आहेत.
0 Response to "अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षपदी प्राध्यापक छाया बोरकर यांची नियुक्ती"
एक टिप्पणी भेजें