ग्रामसभांमध्ये सारथीच्या योजनांचे विद्यार्थ्यांनी केले वाचन..
लाखनी :- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी ही महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या लक्षित गटासाठी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता विविध योजना राबवत आहे. या योजनांची माहिती गाव पातळीवर तळागाळापर्यंत पोहोचावी या हेतूने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी गावांमध्ये होणाऱ्या ग्रामसभांमध्ये सारथीच्या सर्व योजनांचे वाचन युनिक कॉम्प्युटर मध्ये CSMS कोर्स शिकत असलेली विद्यार्थ्यांनी कुमारी मोनाली अरुण शिवणकर या विद्यार्थ्यांनी ने गोंदी ग्रामपंचायत ढिवरखेडा येते चावळी वाचनात सरकारच्या सारथी विविध योजना ह्या लोकांपर्यत पोहोचवल्या आणि इतर 15 ग्रामपंचायत मध्ये विविध विद्यार्थी याप्ररकाच्या योजनांचे वाचन विद्यार्थी करणार आहेत सारथी व महाराष्ट्र ज्ञान महामंडळामार्फत राज्यभर सुरू असलेला सीएसएमएस डीईईपी या डिप्लोमा कोर्सच्या प्रशिक्षणार्थीची यासाठी शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये ध्वजवंदनानंतर होणाऱ्या ग्रामसभांमध्ये सुरुवातीस या योजनेच्या माहितीचे वाचन होणार आहे. यासंदर्भाचा एक आदेश अपर जिल्हाधिकारी तथा सारथीचे सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी यांनी जारी केला आहे.
0 Response to "ग्रामसभांमध्ये सारथीच्या योजनांचे विद्यार्थ्यांनी केले वाचन.."
एक टिप्पणी भेजें