-->

फ़ॉलोअर

विमुक्त जाति ,भटक्या जमाती च्या विविध समस्या मांडणारा हिंगोली लोकसभेतील भावी उमेदवार- डॉ .बि .डि. चव्हाण

विमुक्त जाति ,भटक्या जमाती च्या विविध समस्या मांडणारा हिंगोली लोकसभेतील भावी उमेदवार- डॉ .बि .डि. चव्हाण

(संजीव भांबोरे)
हिंगोली :- डॉ .बि .डि. चव्हाण हा नाव संपुर्ण हिंगोली लोकसभा मतदार संघात परिचित असून व्यवसायाने डॉक्टर आहेत .विमुक्त जाति ,भटक्या जमातीनां न्याय देण्यासाठी त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याकरता व्यक्तीच्या समस्याचे निराकरण करण्याकरता एका फोनवर धावून  जाणे ,सर्वसामान्यांचे प्रश्न सरकार प्रर्यंत पोहचवारा नेता म्हणजे डॉ बि डि चव्हाण . हिंगोली लोकसभा मतदारसंघात बंजारा समाज हा मोठ्या संख्येने आहे.या मतदारसंघात तांडा, वाडी वस्तीत भरपुर समस्या आहेत .आजपर्यंत समस्याचे निराकरण झालेले नाही. अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत .अनेक प्रश्न समाजामध्ये आहेत यावर कोणीही जनप्रतिनिधी बोलायला तयार नाही. तरूण पिढी आज शिक्षण शिकुन बेरोजगार आहेत कारण त्यांना हाताला काम नाही. हिंगोली सारख्या ग्रामीण भागेत कोणत्याही प्रकारच्या उद्योग, कंपनी नाहीत .मग बेरोज़गारी कशी
 कमी होणार यावर लक्ष कोणाचेही नाही,आपण जर विचार केला तर आपल्या देशात महिला पण सुरक्षित नाहीत, तांडा, वाडी वस्तीत पाण्याची सोई सुविधा नाही,लाईट नाही, शेतकऱ्यांकडे दूर्लक्ष सरकार करत आहे, पिकांना जो हमी भाव पाहीजे तो मिळत नाही,शेतकरी आत्महत्या करत आहे,कर्ज मुक्त शेतकरी झाला पाहिजे .आज आपण जर पाहील तर शेतकऱ्यांची मुले शिक्षणापासुन वंचित आहे परीक्षेच्या शिक्षण शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ शासनाने केलेली आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे मुलं परीक्षेला बसू शकत नाही .हिंगोली जिल्हातील उसतोडी,बांधकाम,रोडकाम,ई अशा कामासाठी घरदार सोडुन मुंबई पुणे इतर राज्यामध्ये काम करण्यासाठी आठ ते दहा महीने बाहेर गावी राहतात.त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होते. ते शिक्षणापासुन वंचित रहतात. यामुळे बेरोज़गारी वाढत आहे  जर त्याना योग्य शिक्षण झाल तर आर्थिक स्थिति बदलु शकते यासाठी सरकारने जास्तीत जास्त ग्रामीण भागाकडे लक्ष द्यावे. हिंगोली लोकसभा साठी नविन चेहरा हवा आहे यासाठी जनतेतील सामान्य कार्यकर्ता म्हणजे डॉ .बि. डि .चव्हाण यांचा नेतृत्व संपुर्ण हिंगोली लोकसभेतील जनतेला माहीत आहे. येणाऱ्या काळात जनतेचा प्रतिनिधि म्हणुन त्यांना बघायच आहे, डॉ बि डि चव्हाण यांना हिंगोली लोकसभा मतदार संघाकरता शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नक्कीच त्यांचा विचार करतील त्यात दुमत नाही. हे समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचे काम  करतील यात दुमत नाही.

0 Response to "विमुक्त जाति ,भटक्या जमाती च्या विविध समस्या मांडणारा हिंगोली लोकसभेतील भावी उमेदवार- डॉ .बि .डि. चव्हाण"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article