गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट पत्रकारांचा सत्कार
भंडारा :- जि.प्र. स्वर्गीय फत्तूजी बावनकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ संताजी मंगल कार्यालय तुमसर येथे मा.अनिल जी ब्राह्मणे पोलीस निरीक्षक तुमचं यांच्या हस्ते स्वर्गीय फत्तूजी बावनकर यांच्या फोटोला फोटोला दीप प्रज्वलित करून मारल्यावर पण करण्यात आले तसेच मा.अनिल भाऊ बावनकर माजी आमदार यांच्या हस्ते वर्ग दहावी व वर्ग बारावी मध्ये प्रवीण्य मिळालेल्या गुणवंत दोनशे विद्यार्थ्यांच्या व पत्रकारिता उत्कृष्ट सामाजिक कामगिरी केलेल्या पत्रकारांच्या शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा उत्कृष्ट ज्येष्ठ पत्रकार दिगंबर देशभ्रतार, तालुका पत्रकार अनिलजी कारेमोरे, तालुका पत्रकार देवचंद टेंबरे, यशवंत थोटे, पत्रकार सुरेंद्र चिंधालोरे, पत्रकार रमेश लेदे, पत्रकार संजय नेमाडे, प्राध्यापक वाय.एस.देशभ्रतार, ना.तहसीलदार रमेश खोकले संताजी इस्नेही तेली समाज मंडळ चे अध्यक्ष विनोद मानापुरे, शिवसेना चे शहर अध्यक्ष नितीन शेलोकर, प्रकाश सहारे आदी सत्कारमूर्ती म्हणून तर गुणवंत विद्यार्थी व पालक आदी बहुसंख्येने लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे मंच संचालन अनिल कार्येमुळे व आभार प्रदर्शन व कार्यक्रम मा.अनिल भाऊ बावनकर माजी आमदार व दि मुंबई नागरी सहकारी पतसंस्था व कर्मचारी च्या सहयोगांनी घेण्यात आला.
0 Response to "गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट पत्रकारांचा सत्कार"
एक टिप्पणी भेजें