लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी लेखणीच्या माध्यमातून समाज जागृती चे कार्य केले - समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार
प्रतिनिधी
तुमसर :- ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हा व दि सेल्फ स्टंड रेव्होल्युशन सोशल एज्युकेशन सोसायटी तुमसर च्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी आपल्या भाषणामध्ये म्हणाले की,अण्णाभाऊ चे साहित्य हे जगाच्या पाठीवर एक धारदार अस्त्र असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लेखणीच्या माध्यमातून समाज जागृती कार्य केले. प्रमुख उपस्थितः मध्ये उमाकांत रामटेके, विजय बांगडे, गुरुलाल संतापे, मंजुषा देशभ्रतार, बबीता गजभिये, अमृता मेश्राम, अमृता वासनिक, वेदांती देशभ्रतार, प्राजक्ता देशभ्रतार, संजय खांडकुरे,हर्षवर्धन देशभ्रतार, संघवर्धन देशभ्रतार, विजय बर्वे, दिलीप बुर्डे आधी उपस्थित होते. मंच संचालन उमाकांत रामटेके तर आभार प्रदर्शन मंजुषा देशभ्रतार तर यांनी केले.
0 Response to "लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी लेखणीच्या माध्यमातून समाज जागृती चे कार्य केले - समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार"
एक टिप्पणी भेजें