कुंदन बांडेबुचे यांची नवोदय विद्यालय करिता निवड
कुलदीप गंधे
प्रतिनिधी
पहिला :- जवाहर नवोदय समिती कडून घेतल्या गेलेल्या माहे एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ६ वी करिता जवाहर नवोदय विद्यालय नियुक्ती परीक्षेत पहेला येथील चि. कुंदन विलास बांडेबुचे हा विद्यार्थी महर्षी विद्या मंदिर फुलमोगरा या विद्यालयातुन भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील पाचगाव येथे त्यांची नियुक्ती झालेली आहे . त्यांनी आपल्या नियुक्त यशाचे श्रेय आपले आई व वडील तसेच त्याचे मार्गदर्शक श्री. गोस्वामी सर आणि आपल्या महर्षी विद्या मंदिर विद्यालयातील प्राचार्य श्रुती ओहले मॅडम यांनी दिलेले आहे. त्याच्या मेहनत आणि यशाचे कौतुक पहेला परिसरात होत आहे.
0 Response to "कुंदन बांडेबुचे यांची नवोदय विद्यालय करिता निवड"
एक टिप्पणी भेजें