बपेरा (आ) येथे मेरी माटी, मेरा देश निमित्त प्रभात फेरी
तुमसर प्रति :- ग्रामपंचायत बपेरा (आ) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी मा.देशाचे पंतप्रधान यांनी सुरू केलेल्या अभियाना अंतर्गत जि. परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत बपेरा (आ) च्या वतीने मेरी माटी, मेरा देश अभियाना अंतर्गत भारत मातेच्या व फोटोला वंदन करून प्रभात फेरी झेंडा चौक, उसेरा चौक, अंबागड चौक पर्यंत काढण्यात आली. प्रभात फेरीमध्ये उपसरपंच उत्तम डोंगरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आम्रपाली बाराहाते, अविनाश कडक, सरस्वती दमाहे, पूजा गजबे, लीला दमाहे, अनिल बंधाटे, रामचंद्र बंदाटे, गुरुदास संतापे, दिनकर जायभाय, ग्रामपंचायत शिपाई विजय बांगडे, ग्रामपंचायत सदस्य व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित दर्शवून मेरी माटी, मेरा देश प्रभात फेरी काढून एकतेच्या संदेश दर्शवण्यात आला.
0 Response to "बपेरा (आ) येथे मेरी माटी, मेरा देश निमित्त प्रभात फेरी"
एक टिप्पणी भेजें