आंभोरा पुलिया वरून जाण्यास मज्जाव
• पत्रकारांना सुद्धा कामाची माहिती घेण्यास बंदी
संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी) भंडारा व नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या अंभोरा पुलिया वरून जाण्यास सर्वसामान्य नागरिक त्याचप्रमाणे पत्रकारांना सुद्धा आज दिनांक सहा
६ ऑगस्ट 2023 रोज रविवारला जाण्यास मज्जाव करण्यात आला. मौदी या ठिकाणी पोलिसांच्या चोख बंदोबस्त लावण्यात आले असून टू व्हीलर पायदळ जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे .मागील एक आठवड्यापूर्वी या पुलावरून पायवाट, टू व्हीलर गाडी करिता खुला करण्यात आला होता परंतु आज अचानक बंद करण्यात आलेला आहे. याबाबत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी अड्याळ ठाणेदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता पुलिया च्या मधोमध काम सुरू असल्यामुळे व काम करण्यास अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले परंतु कोणते काम सुरू आहे याबाबत माहिती घेण्यास पत्रकार इच्छुक होते परंतु त्यांना सुद्धा माहिती घेण्यास बंदी घालण्यात आली आहे या भारतात लोकशाही की हुकूमशाही आहे हेच कळत नाही.
0 Response to "आंभोरा पुलिया वरून जाण्यास मज्जाव"
एक टिप्पणी भेजें