महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरीय समाजरत्न पुरस्काराने डॉ .ए.पी.के .संघरत्ने सन्मानित होणार!
- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्यचा पुढाकार
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :- अड्याळ येथील सामाजिक कार्यकर्ते व व्यवसायाने डॉ. असलेले ए.पी.के .संघरत्ने यांचा आज १ मे २०२३ रोज सोमवारला दुपारी दोन वाजता महाराष्ट्र दिनी मुन्ना सभागृह अड्याळ येथे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डी. टी .आंबेगावे यांच्या मार्गदर्शनात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे व राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रात कर्तव्यनिष्ठ राहून आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षितेसाठी अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल मानाचा फेटा ,सन्मानचिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ, देऊन जिल्हास्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने गौरविण्यात येणार आहेत. डॉ संघरत्ने हे रुग्णांकडून अल्प फी आकारून रुग्णांची सेवा करीत असतात .रात्री- बेरात्री कुणाचे फोन आला तर त्यांच्या मदत कार्यात नेहमी तत्पर असतात. वेळेवर गरीब रुग्णांकडे पैसे नसले तर पैसे सुद्धा घेत नाही. समाजकार्यात नेहमी मदत कार्य करतात .त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हास्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत. करिता सर्व पत्रकारांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे विदर्भ संघटक महेंद्र नंदागवळी ,भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे,जिल्हा सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार, पवनी तालुका अध्यक्ष प्रशांत शहारे यांनी केलेले आहे .
0 Response to "महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरीय समाजरत्न पुरस्काराने डॉ .ए.पी.के .संघरत्ने सन्मानित होणार!"
एक टिप्पणी भेजें