-->

फ़ॉलोअर

नागपूर विभागीय वितरण प्रबंधकांची सानगडी केंद्रात भेट

नागपूर विभागीय वितरण प्रबंधकांची सानगडी केंद्रात भेट

 

साकोली :- भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या नागपूर विभागा अंतर्गत साकोली शाखेत ( दि. २१.)  नागपूर विभागातील भारतीय आयुर्विमा महामंडळ प्रबंधक ( वितरण ) अजय शुक्ला यांनी प्रत्यक्षात सानगडी येथील गजानन महाराज चौकातील  एल आय सी साकोली विभाग अंतर्गत अभिकर्ता रोशन कापगते यांच्या कार्यालयात भेट दिली. ३१ मार्च ला १० दिवस बाकी असतांनी प्रबंधक अजय शुक्ला यांची भेट ही भारतीय आयुर्विमा क्षेत्रातील उत्तुंग भरारी घेणारा पुरस्कारप्राप्त रोशन कापगते यांचा उत्साह वाढविण्यास मदत होईल असे त्यांनी प्रतिपादन केले. मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसातील भेट  एल आय सी जनतेच्या विविध आयुर्विमा व्यवसायाच्या दृष्टीने व कार्यक्षम अभिकर्ता रोशन कापगते यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते.  या भेटीमुळे अभिकर्त्यानचा उत्साह वाढून प्रत्येक आयुर्विमा योजनेला चालना मिळू शकते. याप्रसंगी नागपुर विभागातील प्रबंधक अजय शुक्ला यांच्या सोबत साकोली शाखेचे सहायक शाखाधिकारी उमेश लिंगलवार उपस्थित होते.  उपस्थित अधिकारी वर्गांनी रोशन कापगते यांच्या चालू आर्थिक वर्षात १०० विमा पॉलिसी पुर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केले व त्यांच्या कार्याचे कौतुक करीत प्रत्येक ग्रामिण भागात प्रत्येक घरी कुटूंबातील मुलांचे शिक्षण आणि भविष्यात बचत व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विविध पॉलिसी योजनांचे महत्व पटवून सांगितले हे विशेष.

0 Response to "नागपूर विभागीय वितरण प्रबंधकांची सानगडी केंद्रात भेट"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article