जागतिक क्षयरोग दिन जनजागृती रॅलीने साजरा
• संजीवनी नर्सिंग कॉलेज साकोलीचा अभिनव उपक्रम
साकोली :- जागतिक क्षयरोग दिन ( २४ मार्च ) निमित्ताने संजीवनी नर्सिंग कॉलेज साकोली कडून शहरातील मुख्य मार्गाने जनजागृती रॅली काढून साजरा करण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयातून या रॅलीची हिरवी झेंडी दाखवित सुरुवात करण्यात आली.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त तालुका आरोग्य अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय व संजीवनी नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मुख्य मार्गाने जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राकेश नंदेश्वर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपेश बडवाईक यांनी हिरवी झेंडी दाखवित रॅली सुरू झाली. रॅलीला क्षयरोग विभाग अधिकारी सर्वश्री. लोणारे, सलामे, नैतामे, शेंडे, नेरीनकर यांसह संजीवनी नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या चेतना मेश्राम हे जनजागृती रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीत संजीवनी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनींनी क्षयरोग जनजागृती फलके जनतेच्या निदर्शनास आणून देत क्षयरोग निदान उपचार, दक्षता, सावधानी बाळगा असे विविध फलकांतून जनतेला जनजागृती करून संदेश दिला हे विशेष. सदर रॅलीचे कटकवार रोड येथील नाफडे नर्सिंग होम येथील संजीवनी नर्सिंग कॉलेज येथे समापन करण्यात आले.
0 Response to "जागतिक क्षयरोग दिन जनजागृती रॅलीने साजरा"
एक टिप्पणी भेजें