पंतप्रधान व रमाई घरकुल योजनेच्या रकमेत ३ लाख वाढ करण्यात यावी -संजीव भांबोरे राज्य उपाध्यक्ष
• अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाची मागणी
• भंडारा जिल्ह्यातील रेतीघाटचा लिलाव सुद्धा करण्यात यावा
भंडारा- दिवसेंदिवस महागाई वाढत असून केंद्र शासन व राज्य शासनामार्फत गरिबांना घरकुल बांधण्याकरता जी रक्कम दिले जाते ती रक्कम अल्प प्रमाणात असून ३ लाखापर्यंत वाढविण्यात यावी असे मागणी अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संजीव भांबोरे त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे यांनी केलेली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रमाई घरकुल योजनेअंतर्गत १ लाख 65 हजार रुपये दिले जातात .त्याचप्रमाणे पंतप्रधान योजनेअंतर्गत घरबांधणी करता १ लाख 50 हजार रुपये दिले जातात आणि एकूण बांधकाम 350 स्क्वेअर फुट मध्ये करायचं असतो. मिस्त्री स्केअर फुट 150 रुपये घेत असून त्या बांधकामा करता एकूण तीन लाखाच्या जवळपास खर्च येतो .अशा परिस्थितीत लाभार्थ्यांना घरकुल बांधणे शक्य नसते .त्यांना कर्ज काढून घरकुल बांधावे लागते. त्यामुळे ते कर्जबाजारी होतात .350 केअर फूट चे बांधकाम करण्याकरता पाच ट्रॅक्टर विटा एकूण ४५ हजार रुपये , रेती ७ ट्रॅक्टर ३२ हजार रुपये ,लोहा 57 हजार रुपये ,सिमेंट 140 बॅग 45 हजार रुपये ,गिट्टी दोन ट्रॅक्टर ८.३०हजार रुपये, दरवाजे- खिडक्या 20000 रुपये, इतर खर्च १०,००० हजार रुपये ,मिस्त्री खर्च 70 हजार रुपये असा एकूण तीन लाखाच्या जवळपास खर्च येतो .त्यामुळे शासनाने घरकुल बांधकामाचे रकमेत वाढ करून घरकुल लाभार्थ्यांना दिलासा देण्यात यावा . त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यात रेतीघाटचा लिलाव बंद असून लाभार्थ्यांनी घरकुल बांधण्याकरता रेती कुठून आणावी असा प्रश्न निर्माण होतो? करिता शासनाने रेतीघाटचा लिलाव करून लीज नुसार लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी सुद्धा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजीव भांबोरे यांनी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्याचप्रमाणे अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे भंडारा तालुका अध्यक्ष कुलदीप गंधे यांनी शासनाला एका पत्रकाद्वारे केलेली आहे.
0 Response to "पंतप्रधान व रमाई घरकुल योजनेच्या रकमेत ३ लाख वाढ करण्यात यावी -संजीव भांबोरे राज्य उपाध्यक्ष"
एक टिप्पणी भेजें