-->

फ़ॉलोअर

केंद्रीय गृह मंत्री  तथा सहकार मंत्री अमीत शाह यांची नागपूर दीक्षाभूमी सदिच्छा भेट

केंद्रीय गृह मंत्री तथा सहकार मंत्री अमीत शाह यांची नागपूर दीक्षाभूमी सदिच्छा भेट

• भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे घेतले दर्शन


नागपूर ( संजीव भांबोरे ) :- केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले. श्री.शाह यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले.श्री. शाह आणि श्री. फडणवीस यांनी यावेळी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले आणि सदस्य डॉ.राजेंद्र गवई, प्रा. डी. जे. दाभाडे,प्रा.आगलावे, विलास गजघाटे,भंते दीपंकर आदींनी श्री. शाह आणि श्री. फडणवीस यांचे स्वागत केले. मान्यवरांना सन्मानचिन्ह ,शाल आणि ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हे पुस्तक देण्यात आले. आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दटके, माजी मंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर आदी यावेळी उपस्थित होते.

0 Response to "केंद्रीय गृह मंत्री तथा सहकार मंत्री अमीत शाह यांची नागपूर दीक्षाभूमी सदिच्छा भेट"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article