-->

फ़ॉलोअर

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ विधान परिषदे करता बसपा समर्पित उमेदवार निमा संजय रंगारी यांना निवडून देण्याचे आवाहन

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ विधान परिषदे करता बसपा समर्पित उमेदवार निमा संजय रंगारी यांना निवडून देण्याचे आवाहन


संजीव भांबोरे
भंडारा (ऑल इंडिया) :- प्रतिनिधी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ विधान परिषद निवडणूक 2023 करता बहुजन समाज पार्टी च्या भंडारा-गोंदिया लोकसभा प्रभारी निमा संजय रंगारी( निमा मोहरकर )ह्या बहुजन समाज पार्टी समर्पित  उमेदवार असून  त्यांनी पहिल्या पसंतीचे मतदान करून निवडून देण्याच्या आवाहन केलेले आहे आपण मला विधान परिषदेत निवडणुकीत संधी दिल्यास जुनी पेन्शन योजना लागू करणे ,शिक्षकांचे शाळाबाह्य कामे बंद करणे , 20% पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या बहुजन विरोधी निर्णय रद्द करणे, शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरणे ,पवित्र पोर्टल तात्काळ रद्द करणे, संयम अर्थसहाय्य तत्त्वावर शाळा वाटप बंद करणे, विनाअनुदानित शाळांना अनुदान देऊन सर्व शिक्षकांना नियमित सेवेत सामावून घेणे ,निवासी आश्रम शाळेतील शिक्षकांना 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू करणे ,खाजगी शाळेतील शिक्षकांच्या नियुक्ती शासनाद्वारे करण्यात याव्यात, कंत्राटी तासिका तत्त्वावरील शिक्षकांना नियमित सामावून घेणे,  सर्व शिक्षकांना बारा वर्षाची सेवा झाल्यानंतर सरसकट वरिष्ठ श्रेणी लागू करणे, आणि चोवीस वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर सरसकट निवड श्रेणी लागू करणे ,शाळा बंद झाल्यास शिक्षकांचे तात्काळ सेवाजन करणे, विधान परिषदे करता प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा अधिकार लागू करणे, भारतीय संविधानाला अभ्यासक्रमात समाविष्ट करणे ,संविधानिक तत्त्वानुसार समान काम समान वेतन संविधानिक तत्वावर सर्व शिक्षकांना लागू करणे,  वरील सर्वप्रथम प्रश्नांना वाचा फोडण्याकरता व विधान परिषदेत शिक्षकांचा आवाज उठवण्याकरिता क्रमांक  1  पसंतीची मते देऊन  बहुसंख्येने निवडून देण्याचे आवाहन बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते, हितचिंतक, बामसेफचे पदाधिकारी यांनी केलेले आहे.

0 Response to "नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ विधान परिषदे करता बसपा समर्पित उमेदवार निमा संजय रंगारी यांना निवडून देण्याचे आवाहन"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article