ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अचल भाऊ मेश्राम यांना "समाज जीवन गौरव पुरस्कार
भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अचल भाऊ मेश्राम यांचे सामाजिक कार्य लक्षात घेता विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनाच्या वतीने शासकीय विश्रामगृह भंडारा येथे त्यांच्या ५८ वा वाढदिवस साजरा करून विविध संघटना मार्फत त्यांना समाज जीवन गौरव पुरस्कार व शाल-श्रीफळ देऊन सन्मानित करून केक काटण्यात आला.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना रजिस्टर व पेन वाटप करण्यात आले. उपस्थितांमध्ये रोशन भाऊ जांभुळकर, सूर्यभानजी हुमने,नाशिक भाऊ चौरे, डॉ.देवानंद नंदागवळी, शशिकांत भोयर, देवानंदजी नंदेश्वर, जयेंद्र देशपांडे, मंगेश हुमने , अंबादासजी नागदेवे , यशवंतजी नंदेश्वर, समाज सेवक श्रीकृष्ण देशभ्रतार , शशिकांत देशपांडे व विविध संघटनाचे राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
एका ध्येयवेड्या सामाजिक कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील विविध सामाजिक तथा राजकीय संघटनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल व त्यांना दिलेल्या भावी आयुष्याच्या शुभेच्छा व समाज जिवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याची बातमी प्रकाशित केल्याबद्दल आपले मनश्वी धन्यवाद...
जवाब देंहटाएं