गोवा येथे 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत पहिले राष्ट्रीय प्रवासी कवी संमेलन होणार
• संमेलनाच्या अध्यक्षपदी पद्मश्री गोवा राज्याचे जेष्ठ साहित्यिक विनायक खेडेकर, तर प्रमुख अतिथी म्हणून गोवा राज्याचे माहिती आयुक्त संजय ढवळीकर ,तुळशीराम देसाई मुख्याध्यापक (वास्को) गोवा उपस्थित राहणार
संजीव भांबोरे
गोवा (ऑल इंडिया प्रतिनिधी) :- गोवा येथे 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2023 रोजी भारतातील पहिले राष्ट्रीय प्रवासी कवी संमेलन (नाशिक ते गोवा )जागतिक कवी व साहित्यिकाचे हक्काचे व्यासपीठ असणारे पुष्परत्न साहित्यसमूह नाशिक तर्फे होत असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पद्मश्री पुरस्कार प्राप्त गोवा राज्याचे जेष्ठ साहित्यिक व ब्रँड अँबेसिडर गोवा सरकार विनायकराव खेडेकर उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून गोवा राज्याचे माहिती आयुक्त संजय ढवळीकर ,त्याचप्रमाणे तुळशीराम देसाई मुख्याध्यापक मोरगाव हायस्कूल (वास्को) गोवा हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत .या प्रवासी कवी संमेलनाकरिता महाराष्ट्र व विविध राज्यातील साहित्यिकांनी आपले नावे नोंदवली आहेत व ते 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2023 पर्यंत सर्वजण एकत्र राहणार आहेत. एकमेकांच्या कविता, विचार, साहित्य जाणून घेणार आहेत. तसेच गोवा राज्यातील निसर्ग परिस्थिती , तेथील संस्कृती, भाषा साहित्य ,जाणून घेणार आहेत .विशेष म्हणजे कवी, साहित्यिकांना एक वेगळे प्रकारे जाणून घेणार आहेत. हा वेगळाच अनुभव राहणार आहे. पुष्परत्न साहित्य समूह नाशिकचा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी कवी संमेलन ,काव्य गौरव सन्मान सोहळा आयोजित केला जातो. आतापर्यंत 46 च्या वर कवी संमेलन व पुष्परत्न काव्य गौरव सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. या फेब्रुवारी महिन्यात पहिल्या रविवारी म्हणजे 5 फेब्रुवारीला गोवा राज्यात मोरगाव हायस्कूल (वास्को )येथे प्रवासी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे .तसेच साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यवीरांचा गौरव प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. त्याकरिता जास्तीत जास्त कवी, साहित्यिकांनी आपली नोंदणी 15 जानेवारीपर्यंत करावी तसेच जास्तीत जास्त कवी, साहित्यिकांनी सहभागी व्हावे व उपस्थित रहावे व प्रवासी कवी संमेलनाच्या आस्वाद घ्यावा असे आवाहन या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्राध्यापक डॉ .आनंद आहिरे पुष्परत्न साहित्य समूह नाशिक व राष्ट्रीय कार्याध्यक्ष अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद भारत आणि आजीवन सदस्य विश्व मराठी साहित्य परिषद यांनी केलेले आहे. इच्छुक साहित्यिक, कवी ,लेखक यांनी प्राध्यापक आनंद आहिरे संपर्क 73 87 38 64 92 ,सुरेखा बेंद्रे मराठवाडा विभाग प्रमुख पुष्परत्न साहित्य समूह ८६२३२८२८०५, साहेबराव चंदन नाशिक जिल्हाध्यक्ष पुष्परत्न साहित्यसमूह ७५०७१४८६७६, संजय आहेर नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पुष्परत्न साहित्य समूह ९९६००८०२००, राणी चोपडे परभणी जिल्हा अध्यक्ष पुष्परत्न साहित्य समूह ९९७५३६८६३० , शितल शेगोकार बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पुष्परत्न साहित्य समूह 9022312251 ,कवी सरकार इंगळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पुष्परत्न साहित्यसमूह 9657888268 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावे. वरील सर्व कार्यक्रमाचे संचालक विडंबनकार कवी संजय आहेर करणार आहेत.
0 Response to "गोवा येथे 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत पहिले राष्ट्रीय प्रवासी कवी संमेलन होणार"
एक टिप्पणी भेजें