तुमसर येथील नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांच्याशी तुमसर शहरातील समस्या बाबत जनता की आवाज घेतलेली प्रत्यक्ष मुलाखत
संजीव भांबोरे
भंडारा (ऑल इंडिया प्रतिनिधी) :- नगरपरिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्याशी जनता की आवाज च्या टीमने त्यांच्या नगरपरिषद कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन मन मोकळेपणाने तुमसर शहरातील अनेक समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी जनता की आवाज च्या प्रतिनिधी यांनी त्यांना तुमसर शहरातील साफसफाई ,यातून त्यांना मिळणारी मुक्तता ,शहरातील मच्छी मार्केटमध्ये दिवसेंदिवस वाटत असलेली गंदगी त्यातून नागरिकांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम ,तुमसर शहरात होणारे अतिक्रमण, पार्किंगची असुविधा ,त्यातून नागरिकांनी मिळणारी मुक्तता ,तुमसर शहरात विकासाच्या दृष्टिकोनातून काय पावली उचललीत ,तुमसर शहरातील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या ,त्यांना मिळणारे अनियमित वेतन या विविध विषयावर त्यांच्याशी चर्चा करण्यात आली .त्यांनी या वरील विषयावर मनमोकळेपणाने चर्चा करून सदर प्रतिनिधीला सविस्तर माहिती दिली .यावेळी त्यांच्यासोबत जनता की आवाज चे मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार ,तंत्र सहायक हर्षवर्धन देशभ्रतार ,मधुकर कोहाड कार्यकारी संपादक सामाजिक कार्यकर्ते संकेत गजभिये यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Response to "तुमसर येथील नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांच्याशी तुमसर शहरातील समस्या बाबत जनता की आवाज घेतलेली प्रत्यक्ष मुलाखत"
एक टिप्पणी भेजें