आपले संवैधानिक अधिकार मिळवून घ्यायचे असतील तर ओबीसींना एकत्र येण्याची गरज --माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे
नागपूर येथील रवी भवन सभागृहात प्रतिपादनया बैठकीत विदर्भातील अनेक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
नागपूर (संजीव भांबोरे) :- राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाची बैठक नागपूर येथील रवी भवन सभागृहात पार पडली या बैठकीचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे उपस्थित होते .या बैठकीला मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले ,छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या विचाराचा भारत बनवायचा असेल तर सर्व 85 टक्के समाजातील ओबीसी बहुजन समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. आज स्वातंत्र मिळून 75 वर्ष झाले स्वातंत्रच्या सुवर्ण महोत्सव आपण दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा करतो परंतु ओबीसी आणि बहुजन समाज यासाठी हा फार चिंतेचा विषय आहे .या देशात 85 टक्के ओबीसी बहुजन समाज असून सुद्धा शिक्षण ,नोकरी, शेतजमीन व्यवसाय यांच्या बाबतीत आत्मनिर्भरतीची गोष्टी केल्या जातात परंतु वास्तविकता या ओबीसी समाजासाठी कोणतेच ठोस उपाय योजना करण्यात आलेली नाही .त्यामुळे आजादीच्या सुवर्ण महोत्सव नंतर सुद्धा आज ओबीसी समाज संविधानिक अधिकाऱ्यापासून दूर आहे. ही फार शोकांतिका आहे .आपला भारत देश कृषिप्रधान देश असून सुद्धा या शेतकऱ्याला त्याच्या उत्पादक खर्चाच्या आधारित मूल्य मिळत नाही. त्यामुळे या देशातील 80 टक्के लोकांना आपल्या अधिकाराची लढाई लढण्याकरता बाध्ये व्हावे लागत आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात 50 टक्के आरक्षण बहुजन समाजाला इ. स. 1902 मध्ये दिले. इ. स.1931 ला इंग्रजांच्या काळात देशात जनगणना केली .परंतु तेव्हापासून आजपर्यंत जनगणना केली गेली नाही. आपल्या घरचे कुत्रे ,डुकरे ,मांजरे ,यांची गणना केल्या जाते .परंतु आम्ही माणसं असून सुद्धा त्याची जन गणना केल्या जात नाही ही या देशाची एक शोकांतिका आहे. याचे कारण असेल तर हा समाज शैक्षणिक दृष्ट्या ,आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या प्रगत नाही . हा समाज सत्तेपासून दूर असला पाहिजे याकरिता सरकार जनगणनेकरिता घाबरत आहे .समजा जनगणना झाली तर येतील ओबीसी बहुजन समाज संख्येने मोठा असल्यामुळे त्यांना त्यांच्या संख्येप्रमाणे वाटा द्यावा लागणार... ही भीती या देशातल्या राज्य कर्त्यांना आहे व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनेल त्यामुळे सरकार ओबीसीची जनगणना करण्यापासून दूर जात आहे. असे सुद्धा यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. संविधान लागू होण्याअगोदर देशाचा राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा म्हणजे राजाच्या हुकमाप्रमाणे आपल्याला वागण्याच्या अधिकार होता .परंतु डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले व या देशात लोकशाही लागू झाली त्या दिवसापासून देशाचा राजा मतपेटीच्या माध्यमातून जन्म घेऊ लागला. परंतु यामध्ये सवर्ण लोकांनी अनेक अडचणी निर्माण केल्या. यावेळी प्रामुख्याने उपस्थित राष्ट्रीय सचिव ऍंड. सरिता जामनिक,राष्ट्रीय युवक महासचिव गणेश भाऊ पारधी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष विजय पटले,सौ रीना ताई जुनघरे अध्यक्ष महिला प्रदेश, प्रदेश उपाध्यक्ष संजीव भांबोरे,राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघ , प्रदेश अध्यक्ष वसंतकुमार देशमुख राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघ, विनोद के. चौधरी राष्ट्रीय संघटन सचिव, सौ.सुषमा ताई डांगे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, श्री. रोशन बनकर प्रदेश महासचिव युवक राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघ, रविकांत खोब्रागडे राष्ट्रीय प्रचार प्रमुख राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघ, सौ. प्रमिला ताई रहांगडाले प्रदेश उपाध्यक्ष महिला राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघ, जितेश भगत जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघ नागपूर, सौ. लीना ताई कटारे विदर्भ प्रमुख राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघ, टेकचंद रहांगडाले जिल्हा उपाध्यक्ष नागपूर, रोशन उज्जेनकर विदर्भ उपाध्यक्ष, मनोज पटले खरबी अध्यक्ष नागपूर,शोभना ताई गौरशेट्टीवार प्रदेश उपाध्यक्ष, सौ. कविता लिचडे गोंदिया जिल्हा अध्यक्ष, सौ. उषा ताई ठाकरे , हिरोसीमा रामटेके, हितेश बघेले महासचीव गोंदिया जिल्हा, सुरेंद्र ठाकरे , राजू चौहान, ज्ञानेश्वर नराजे पाटील, राजेश बिसेन, रज्जत भैरम नागपूर शहर प्रमुख, इतर पदाधिकारी मोट्या संख्येत उपस्थित होते.
0 Response to "आपले संवैधानिक अधिकार मिळवून घ्यायचे असतील तर ओबीसींना एकत्र येण्याची गरज --माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे"
एक टिप्पणी भेजें