संविधान सम्मान दिन साजरा
- संविधान प्रतियोगिता सम्मान दिन साजरा
- मा.पोलीस अधीक्षक भंडारा लोहित मतांनी यांची उद्धारक म्हणून उपस्तिथी
भंडारा प्रतीनिधी
भंडारा :- केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली व समविचारी सामाजिक संगठना भंडारा जिल्ह्याच्या संयुक्त विद्यमाने आज संविधान दिन व संविधान सन्मान प्रतियोगीता परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम जि. प. सभागृह भंडारा येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. लोहीत मतानी (IPS) पोलीस अधीक्षक भंडारा, कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली चे राष्ट्रीय चेअरमैन डॉ. मिलिंद दहिवले तर प्रमुख अतिथी मा. राहुल गवई (IFS) जिल्हा उप वनसंरक्षक भंडारा, मा. विजय पाडवी जिल्हा क्रूषी विकास अधिकारी जि. प. भंडारा, मा. रोशनजी जांभुळकर (शाळा संचालक), मा. डॉ. रतनकुमार गेडाम, मा. सुर्यभानजी हुमने उपमहासचिव कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रास (फोटो) व भारतीय संविधानास पुष्पहार अर्पीत करुन दिप प्रज्वलित करुन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. सामुहिक रित्या संविधान प्रास्ताविक चे वाचन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. २० नोव्हेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या संविधान सन्मान प्रतियोगीता परीक्षेत प्राविण्य प्राप्त २० विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, संविधान, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तर १०० विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक खंड व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यासोबतच परीक्षे दरम्यान सेवाभावी व्रुत्तीने सेवा देणाऱ्या ५० केंद्रप्रमुख/पर्यवेक्षकांना सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक पुस्तके भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता रोषनभाऊ जांभुळकर, अचलभाऊ मेश्राम, नाशिकभाऊ चवरे, सुर्यभानजी हुमने, मंगेशभाऊ हुमने, प्रा. युवराज खोब्रागडे सर,श्रीकृष्ण देशभ्रतार देशपांडे सर, सोपानजी रंगारी सर, हर्षवर्धन देशभ्रतार, अंबादासजी नागदेवे, संदेश गजभिये, सचिन बागडे, निलेश वालकर, शशिकांत देशपांडे व सहकाऱ्यांनी खुप अथक परिश्रम घेतले त्यासोबतच सामाजिक बांधिलकी असलेल्या समाजबांधवांनी तन मन धनाने सहकार्य सुद्धा केले. त्या सर्वांच्या सहकार्याने खुप मोठ्या उत्साहात व भरगच्च विद्यार्थी व जनसमुदायात संविधान दिनाचे कार्यक्रम पार पाडण्यात आले.
0 Response to "संविधान सम्मान दिन साजरा "
एक टिप्पणी भेजें