बहेनजी शेरनी आहे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही-- बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय कॉर्डिनेटर आकाश आनंद
माटुंगा येथील षन्मुखानंद सभागृहात हजारोच्या संख्येने बसपा कार्यकर्त्यांची हजेरी
मुंबई (संजीव भांबोरे) :- बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष कुमारी बहन मायावतीजी ह्या शेरनी असून बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय कॉर्डिनेटर आकाश आनंद यांनी मुंबई माटुंगा येथील षन्मुखानंद सभागृह येथील सभागृहात मार्गदर्शन करताना सांगितले .यापुढे ते म्हणाले की ,बहनजी उत्तरप्रदेश मुख्यमंत्री असताना सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाचे ,महिलांच्या विकासाचे, विद्यार्थी, कामगार, बेरोजगारांना रोजगार ,घरकुल योजना महापुरुषांच्या विविध नावाचे जिल्हे निर्माण केले. हजारो लोकांना जमिनीचे पट्टे वाटप केले .शासन प्रशासन व्यवस्थित होतं .कुठल्याही प्रकारचे दंगे झालेले नाही. महिला सुरक्षित होत्या .बाबरी मज्जिद पडल्यानंतर उत्तर प्रदेशात कोणत्याच पद्धतीच धोका निर्माण झालेला नाही .याबद्दल सविस्तर माहिती दिली .अशा त्यांच्या कामाची विस्तृत माहिती यावेळी त्यांनी दिली . आपण शेरनी मायावतीजी राष्ट्रीय स्तरावर असताना कार्यकर्त्यांना घाबरण्याची गरज नाही असे कार्यकर्त्यांना त्यांनी विचार मंचावरून आवाहन केले .आणि आता महाराष्ट्रात सुद्धा बहुजन समाज पार्टी चे सरकार बनणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून विचार मंचावर वरून बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय कार्डिनेटर आकाश आनंद यांनी सांगितले. यावेळी विचार मंचावर बहुजन समाज पार्टीचे माजी खासदार अशोक सिद्धार्थ ,राज्यसभा खासदार रामजी गौतम ,
नितीन सिंहजी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संदीप ताजने ,महाराष्ट्र प्रदेश सचिव विजयकुमार डहाट ,महाराष्ट्र प्रदेश सचिव शंकर भेंडारकर, चलगेस चलवादी प्रभारी महाराष्ट्र ,मनीष कावळे प्रभारी महाराष्ट्र यावेळी प्रामुख्याने विचार मंचावर उपस्थित होते. यावेळी भंडारा गोंदिया लोकसभेच्या प्रभारी निमा मोहरकर, कुंजन शेंडे ,रोहित डहाट आशिष मेश्राम , वर्षा शहारे ,सुरेखा डोंगरे ,रंजना ढोरे ,वर्षा वाघमारे, नितीन शिंगाडे, जितेंद्र घोडेस्वार, सुवर्णा रामटेके ,सुनंदा नितनवरे, बबीताताई डोंगरवार ,अमित रामटेके , ,यावेळी महाराष्ट्रातील संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Response to "बहेनजी शेरनी आहे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही-- बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय कॉर्डिनेटर आकाश आनंद"
एक टिप्पणी भेजें