आशिष मेश्राम यांची अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी संघटनेच्या पवनी तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती
भंडारा :- पवनी तालुक्यातील चिचाळ येथील रहिवासी ग्रामपंचायत सदस्य आशिष हिरालाल मेश्राम यांची अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी संघटनेच्या पवनी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे . ही नियुक्ती संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष राजेश उके यांच्या सूचनेवरून अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आलेली आहे. अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी संघटना सामाजिक संघटना असून एनजीओ आहे .आशिष मेश्राम यांना सामाजिक कार्याची आवड असून हे अपंग ,दिव्यांग ,मतिमंद , मूकबधिर, अंध, यांना संघटनेसोबत जोडून संघटन वाढीकरता प्रयत्न करतील व त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील.
0 Response to "आशिष मेश्राम यांची अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी संघटनेच्या पवनी तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती"
एक टिप्पणी भेजें