समाजाचा आरसा पत्रकार यांना विविध सोयी सवलती उपलब्ध करून देण्याची गरज
पत्रकार हा एक समाजाचा आरसा आहे . मग तो पत्रकार दैनिक पेपरचा असो किंवा साप्ताहिक असो किंवा पोर्टल मीडिया असो. समाजाच्या विविध समस्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडून मग तो हिवाळा, पावसाळा ,उन्हाळा असो किंवा कोणतीही रोगराई आपल्या मुलाबाळांची पत्नींची तमा न बाळकता अशा सर्व परिस्थितीत आपल्या जीवाची तमा न बाळगता रात्री बे रात्री तो समाजासाठी धावून जातो व ती बातमी संकलन करून वर्तमानपत्रात प्रकाशित करून जन माणसापासून तर शासन स्तरावर पोहोचवण्याच्या काम करीत असतो .परंतु या पत्रकाराची आज काय दयनीय अवस्था आहे याकडे केंद्रशासन पासून राज्य सरकारचे या पत्रकारांकडे दुर्लक्ष आहे .विविध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते ,त्यांचे अनेक बातम्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते प्रकाशित करायला लावतात. व त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून ते प्रकाश झोतात येतात. त्या माध्यमातून त्यांना ग्रामपंचायत सदस्य, सरपंच , उपसरपंच ,पंचायत समिती सदस्य ,जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष ,आमदार, खासदार ,मंत्री ,असे पद मिळतात. व याच लेखणीच्या माध्यमातून त्यांना पदे सुद्धा गमवावे लागतात .परंतु हा पत्रकार बिचारा अनेकांना न्याय मिळवून देतो परंतु या पत्रकाराची काय व्यवस्था आहे याकडे कोणत्याही जनप्रतिनिधीचे यांच्याकडे लक्ष नाही .खरे तर आज पत्रकारांना ग्रामीण स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत सर्वच पत्रकारांना मानधन देण्याची आवश्यकता आहे .त्याचप्रमाणे वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर पेन्शन सुद्धा देण्याची गरज आहे .बोटावर मोजक्याच इतके पत्रकारांना मानधन दिल्या जाते. मात्र 90% पत्रकारांची दयनीय अवस्था आहे .आज पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत. पत्रकारांना मानधन लागू करण्यात यावे, केंद्र शासनापासून तर राज्य सरकारच्या विविध ग्राम स्तरापासून राज्यस्तरापर्यंतच्या विविध शासनाच्या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून पत्रकारांची नियुक्ती करण्यात यावी ,पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये पत्रकारांना बसण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी ,पत्रकाराला पेन्शन लागू करण्यात यावे , तीन वर्ष पूर्ण केलेल्यांना पत्रकारांना अधिस्वीकृती ओळखपत्र देण्यात यावे ,पत्रकारावर झालेले अन्यायाची त्वरित दखल घेण्यात यावे, पत्रकारावर खोटे आरोपात दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत, अशा प्रकारचे नियोजन केंद्र शासनापासून राज्यस्तरावर केंद्राच्या कॅबिनेट व राज्याच्या कॅबिनेटमध्ये मध्ये ठराव पारित करण्यात यावा . व याकरिता आमदार ,खासदार यांनी हा प्रश्न मार्गी लावून त्यांना न्याय देण्याची नितांत गरज आहे.
संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य
0 Response to "समाजाचा आरसा पत्रकार यांना विविध सोयी सवलती उपलब्ध करून देण्याची गरज"
एक टिप्पणी भेजें