निमगाव गावाचे तात्काळ पुनर्वसन करा -आमदार भोंडेकर यांना निवेदन
संजीव भांबोरे
भंडारा ( ऑल इंडिया प्रतिनिधी) :- गोसीखुर्द धरणाच्या बाधित क्षेत्रात येत असलेले भंडारा तालुक्यातील पहेला येथून 3 किलोमीटर अंतरावर असलेले निमगाव गावाचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे या मागणीचे निवेदन भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना निमगाव येथील ग्रामवासियांनी एका निवेदनाद्वारे केलेली आहे .याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील तीन-चार महिन्यापूर्वी गोसेखुर्द च्या बॅकवॉटरमुळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाण्याची टाकी ,पाण्याची बोरवेल, स्मशानभूमी ज्या लोकांची शेती संपादित केली नव्हती अशा बऱ्याच लोकांच्या शेतात पाणी जमा झाले होते व निमगाव गावाला पाण्याने वेढलेले होते. त्यामुळे येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला होता. त्यामुळे निमगाव गावाला जिल्हाधिकारी भंडारा, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय महसूल अधिकारी यांनी भेट देऊन आपल्या गावाचा प्रश्न निकाली काढण्यात येईल असे आश्वासन दिले होते .परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले .त्यामुळे आज दिनांक 16 ऑक्टोंबर 2022 ला भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना निमगाव ग्रामवासियांनी निवेदन देऊन पुनर्वसनाची मागणी केली. निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे, बालु चवळे उपसरपंच, कवडू गाढवे ,नथूजी लुटे ,यशवंत टिचकुले ,मंगेश वंजारी ,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Response to "निमगाव गावाचे तात्काळ पुनर्वसन करा -आमदार भोंडेकर यांना निवेदन"
एक टिप्पणी भेजें