बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्याच्या वतीने बहुजन नायक कांशीराम साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई येथे राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न
संजीव भांबोरे
मुंबई -(ऑल इंडिया प्रतिनिधी ):- बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्याच्या वतीने कपिल वस्तू बुद्ध विहार शांताक्रुज मुंबई येथे दिनांक आज 10 ऑक्टोंबर 2022 ला रोज सोमवारला दुपारी1 वाजता बहुजन समाज पार्टीचे संस्थापक बहुजन नायक कांशीराम साहेब यांच्या 16 स्मृतिदिनानिमित्त कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलेला होता .या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ .अशोक सिद्धार्थ नॅशनल कोऑर्डिनेटर बहुजन समाज पार्टी उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नितीन सिंग राष्ट्रीय कोऑर्डिनेटर प्रभारी महाराष्ट्र राज्य बसपा ,बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट संदीप ताजने, प्रशांत इंगळे ,सुनील डोंगरे मनीष कावळे ,नागोराव जयकर प्रदेश महासचिव, झोन प्रभारी नागपूर तथा प्रदेश सचिव विजयकुमार डहाट ,यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत बहुजन नायक कांशीराम साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले . यावेळी महाराष्ट्रातील बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष ,प्रदेश सचिव ,विधानसभा अध्यक्ष जिल्हा प्रभारी , प्रदेश सचिव शंकर भेंडारकर ,भंडारा-गोंदिया लोकसभा प्रभारी निमा मोहरकर ,भंडारा जिल्हा प्रभारी सुरजभान चव्हाण , गोंदिया जिल्हा अध्यक्ष दिनेश गेडाम ,सुशील वासनिक प्रदेश सचिव चंद्रपूर व त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Response to "बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्याच्या वतीने बहुजन नायक कांशीराम साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई येथे राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न"
एक टिप्पणी भेजें