अड्याळ येथील वैशाली बौद्ध विहार येथे 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा
संजीव भांबोरे
भंडारा (ऑल इंडिया प्रतिनिधी) :- पवनी तालुक्यातील अड्याळ येथील वैशाली बौद्ध विवाह बाजारपेठ येथे 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेशजी मेश्राम होते. प्रमुख अतिथी अड्याळ चे ठाणेदार आदरणीय श्री सुधीरजी बोरकुटे साहेब API, बिट जमादार श्री. आळे साहेब,डॉक्टर सौ. शीला गणेशजी मेश्राम,मेजर श्री, रहांगडाले, श्री धुर्वे, ग्रामपंचायत पंचायत सदस्य श्री. अतुल गभने, श्री. हेमराज जी चव्हाण, श्री अमोलभाऊ थुलकर, श्री. देवाजी जांभुळकर सर, अर्जुन जी जनबंधू,राजेश कराडे, अशोक अंबादे हे होते... सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सर्व अतिथिंच्या हस्ते बुद्ध मूर्तीला माल्यार्पण व दिपप्रज्वलन केले, त्यानंतर प्रमुख अतिथी ठाणेदार श्री. सुधीरजी बोरकुटे साहेब यांनी महामानव विश्वरत्न प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण केले...अतिथीच्या स्वागता नंतर अतिथीनी , अध्यक्ष यांनी सर्व समाजबांधवाना मोलाचे मार्ग दर्शन केले व या दिनाचे महत्व , बौद्ध धम्माचे पंचशील, अष्टन्गिक मार्ग, दस परिमिता,धम्म दीक्षेच्या बाविस प्रतिज्ञा.. याबाबत सखोल मार्ग दर्शन केले... दरम्यान उपस्थित उपासक, उपासिकेने सुंदर असे भीमगीत सादर केले.. त्यानंतर सामूहिक बौध्द वंदना घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन, आभार प्रदर्शन वैशाली बौध्द विहार समिती चे अध्यक्ष तथा माजी सरपंच श्री. मुनीश्वर मो. बोदलकर यांनी केले.. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे सदस्यगण, उपासक, उपासिका, युवकांनी.. परिश्रम घेतले.
0 Response to "अड्याळ येथील वैशाली बौद्ध विहार येथे 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा"
एक टिप्पणी भेजें