पहेला येथे मंडई निमित्त 2 नोव्हेंबरला भीक नाटकाचे आयोजन
संजीव भांबोरे
भंडारा - ( जिल्हा प्रतिनिधी) :- तालुक्यातील पहेला येथे बाल युवक सांस्कृतिक नाट्य युवा मंडळ च्या वतीने खास मंडई निमित्त 2 नोव्हेंबरला रात्री 10 वाजता भीक सांस्कृतिक नाटकाचे आयोजन करण्यात आलेले आहे .या नाटकाचे उद्घाटक एडवोकेट आनंदराव काटेखाये संस्थापक गांधी शिक्षण संस्था करतील .तर सहउद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते दयानंद नखाते राहतील. दीप प्रज्वलन वैद्यकीय अधिकारी डॉ .कांबळे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला करतील .दीपक वानखेडे सुचित राईस मिल पाघोरा प्रमुख उपस्थित राहतील . सत्कार मूर्ती म्हणून जिल्हा परिषद सदस्य कविता उईके ,पंचायत समिती काजल चवळे ,पंचायत समिती सदस्य सीमा रामटेके उपस्थित राहतील .विशेष अतिथी म्हणून डॉ शुभम गुरुवे, अहिर मंडळ अधिकारी ,ठाणेदार सुधीर बोरकुटे अड्याळ पोलीस स्टेशन ,मंगला ठवकर सरपंच पहेला , उपसरपंच सुशील बांडेबुचे ,सखाराम चवळे , चंद्रशेखर खराबे पोलीस पाटील, संजीव भांबोरे राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघ ,यामिनी बांडेबुचे माजी जिल्हा परिषद सदस्य ,प्रशांत बांडेबुचे, दलिराम फेंडर, सुनील शेंडे ,राजेश मेश्राम ,घनश्याम खराबे, मंगला बांडेबुचे ,छाया फेंडर प्रमिला थोटे, महेश अर्जुनकर ,माधव गेडाम, धनराज भोयर, अनिल दहिवले ,वामन ठवकर ,बोधराज भोयर, केवळ बांडेबुचे उपस्थित राहतील. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन बाल युवा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राजेश बोंदरे, सचिव रामेश्वर खराबे, उपाध्यक्ष मधुकर ठवकर, श्रीकृष्ण कहालकर ,गुलाब चवळे, राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे भंडारा तालुका अध्यक्ष कुलदीप गंधे , विलास बांडेबुचे, प्रवीण ठवकर ,शालिक लुटे, जितू बांधते, सचिन ठवकर ,यांनी केलेली आहे.
0 Response to "पहेला येथे मंडई निमित्त 2 नोव्हेंबरला भीक नाटकाचे आयोजन"
एक टिप्पणी भेजें