अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेच्या विदर्भ प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ .संजय चव्हाण यांची नियुक्ती
संजीव भांबोरे
अकोला, (ऑल इंडिया प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना येथील रहवासी विविध सामाजिक संघटनेशी निगडित असलेले व पत्रकार ,समाजसेवक डॉ. संजय भोपतराव चव्हाण अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेच्या विदर्भ प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांची ही नियुक्ती अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक श्रीकृष्ण देशभ्रतार यांच्या आदेशावरून अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी एका लेखी पत्रिका द्वारे केलेली आहे. अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी संघटना ही अपंग मूकबधिर ,कर्णबधिर, अंध यांच्या विविध प्रश्नावर संघर्ष करणारी संघटना असून या संघटनेत मराठवाडा विभागातील विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या युवक युवती अपंग ,मूकबधिर कर्णबधिर, अंध या सर्वांना या संघटनेत सहभागी व्हावं असे आवाहन सुद्धा संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे .ज्यांना या सेवाभावी संघटनेस सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9130137110 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा विदर्भ उपाध्यक्ष डॉ. संजय चव्हाण यांनी केलेले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे
0 Response to "अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेच्या विदर्भ प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ .संजय चव्हाण यांची नियुक्ती"
एक टिप्पणी भेजें