अखिल भारतीय धॄवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी किरण अडागळे सातारा यांची नियुक्ती.
संजीव भांबोरे
सातारा- (ऑल इंडिया प्रतिनिधी) अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकृष्ण देशभ्रतार यांचे आदेशानुसार राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी एका पत्रकाद्वारे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी किरण अडागळे सातारा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर ,सोलापुर जिल्हे आहेत. ही संघटना मुकबधीर, कर्णबधिर,अपंग व अंध बांधवांसाठी काम करते. अडागळे सध्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तसेच फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र सातारा प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. विविध सामाजिक संघटनेशी संबंध असुन अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात. ज्या युवक युवती, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना या सामाजिक संघटनेत काम करायचे आहे त्यांनी पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष किरण अडागळे यांचेशी 8830278976 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Response to "अखिल भारतीय धॄवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी किरण अडागळे सातारा यांची नियुक्ती."
एक टिप्पणी भेजें