ग्रामपंचायत पहेला येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा कार्यक्रम संपन्न
संजीव भांबोरे
भंडारा (ऑल इंडिया प्रतिनिधी) :- तालुक्यातील पहेला ग्रामपंचायत येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ग्रामपंचायत पहेला येथे आज दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोज बुधवार ला दुपारी 12वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भंडारा पंचायत समितीच्या सदस्य काजल चवळे उपस्थित होते .तर प्रमुख अतिथी म्हणून पहेला ग्रामपंचायतच्या सरपंच मंगलाताई ठवकर ,उपसरपंच सुशील बांडेबुचे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, हनुमान देवास्थान कमिटीचे सचिव प्रशांत बांडेबुचे , पहेला येथील मंडळ अधिकारी अहिर साहेब ,तालुका कृषी अधिकारी झोडापे ,कृषी विस्तार अधिकारी रवींद्र धांडे, ग्राम विकास ग्राम विकास अधिकारी प्रदीप लांजेवार, यांच्या प्रमुख उपस्थितीत शासनाच्या विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले .त्यामध्ये जन्मतारखेचा दाखला, मृत्यू दाखला, नमुना आठ अ प्रमाणपत्र, निराधार दाखला, अपंगाचे प्रमाणपत्र ,जॉब कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र ,कास्ट सर्टिफिकेट, सातबारा नमुना ,अशा विविध योजनेचे दाखल्याचे वाटप तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना लाभार्थ्यांना योजनेची माहिती देऊन अर्ज सादर करणे विषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ग्रामपंचायत सदस्य राजेश मेश्राम ,ग्रामपंचायत सदस्य सुनील शेंडे, ग्रामपंचायत सदस्य मंगला बांडेबुचे, ग्रामपंचायत सदस्य योगिता धुळसे, ग्रामपंचायत सदस्य छाया फेंडर ,ग्रामपंचायत सदस्य घनश्याम खराबे ,ग्रामपंचायत सदस्य प्रमिला थोटे ,तलाठी रवींद्र हटवार, कार्तिक वाघधरे संगणक आपरेटर ,रामेश्वर खराबे लिपिक, प्रशांत राऊत, उमेश बांगडे, ग्रामस्थ व लाभार्थी या ठिकाणी प्रामुख्याने यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ग्रामविकास अधिकारी प्रदीप लांजेवार तर आभार झलके तलाठी यांनी मानले.
0 Response to "ग्रामपंचायत पहेला येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा कार्यक्रम संपन्न"
एक टिप्पणी भेजें