साप्ताहिक जनता की आवाज ची घेतली दखल
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता 13 ऑक्टोंबर ऐवजी 16 ऑक्टोंबर ला होणार
अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती मागणी
भंडारा विशेष प्रतिनिधी:- महाराष्ट्रातील विविध 18 जिल्ह्यातील 82 तालुक्यातील 1166 ग्रामपंचायत च्या निवडणुका ह्या राज्य निवडणूक आयोगाने 13 ऑक्टोंबर ला मतदानाची तारीख निश्चित केली होती व 14 ऑक्टोबरला मतमोजणीची तारीख निश्चित केली होती. परंतु १४ ऑक्टोंबरला धम्मचक्र परिवर्तन दिन असल्यामुळे व बौद्ध धर्मीयांचा सण असल्यामुळे संपूर्ण बौद्ध बांधव या कार्यक्रमात व्यस्त असतात त्यामुळे 14 ऑक्टोबर मतमोजणीची तारीख रद्द करण्यात यावी व 14 ऑक्टोंबर नंतर निवडणुकीची तारीख घोषित करण्यात यावी. अशी मागणी अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे त्याचप्रमाणे अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक/ सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी 9 सप्टेंबर 2022 ला राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी पत्र द्वारे केलेली होती. त्या पत्राची दखल निवडणूक आयोगाने घेऊन त्या तारखेत बदल केलेला आहे .आता 13 ऑक्टोबर ऐवजी मतदान 16 ऑक्टोबरला 2022 होईल व 14 ऑक्टोंबर मतमोजणी ऐवजी 17 ऑक्टोंबर 2022 ला मतमोजणी होईल .राज्य निवडणूक आयोगाने 7 सप्टेंबर 2022 ला 1166 महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तारीख घोषित केली होती. त्यात ग्रामपंचायत सदस्यसह थेट सरपंचाचा समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोंबर 2022 ला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.50 वाजेपर्यंत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. व मतमोजणी ची तारीख 17 ऑक्टोबर 2022 ला होईल.
0 Response to "साप्ताहिक जनता की आवाज ची घेतली दखल "
एक टिप्पणी भेजें