जिद्द ,मेहनत, चिकाटी, परिश्रमातून समाजकार्याला प्रेरणा- राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे
ग्रामपंचायत सदस्य आशिष मेश्राम यांच्या वाढदिवसानिमित्त चिचाळ येथे मार्गदर्शन
भंडारा प्रतीनिधी दिगंबर देशभ्रतार :- माणसाच्या मनात ,जिद्द , मेहनत, चिकाटी, परिश्रम असेल आणि त्यांना सामाजिक कार्याची जाणीव असेल तर तो व्यक्ती खरोखरच जीवनात यशस्वी ठरतो असे मत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी ग्रामपंचायत सदस्य आशिष मेश्राम यांच्या वाढदिवसानिमित्त पवनी तालुक्यातील चिचाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा येथे वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना सांगितले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चुनीलाल लांजेवार होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच लोकमुद्राताई वैरागडे, माजी पंचायत समिती सदस्य नरेंद्र बिलवणे ,माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज वैरागडे ,ग्रामपंचायत सदस्य निलेश काटेखाये यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते . यांनी सुद्धा यावेळी मार्गदर्शन केले. या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ ,देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने भाकरे सर ,मंगला बोरकर, मनोज वैरागडे यांचा कोरोना काळात केलेल्या त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना कोरोना सन्मानपत्र देऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य वतीने गौरविण्यात आले .त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य आशिष मेश्राम यांचा शाळा व्यवस्थापन समिती व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे वतीने शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .ग्रामपंचायत सदस्य आशिष मेश्राम यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त कान्हेट मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून 38 विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने भाकरे सर, अनेराव मॅडम ,फंदे मॅडम, धांडे मॅडम ,मरगडे मॅडम, प्रामुख्याने उपस्थित होते .
0 Response to "जिद्द ,मेहनत, चिकाटी, परिश्रमातून समाजकार्याला प्रेरणा- राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे"
एक टिप्पणी भेजें